मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: 'हा' मुंबईकर करणार मँचेस्टर टेस्टमध्ये पदार्पण, पाहा संभाव्य Playing 11

IND vs ENG: 'हा' मुंबईकर करणार मँचेस्टर टेस्टमध्ये पदार्पण, पाहा संभाव्य Playing 11

इंग्लंड विरुद्धच्या  (India vs England) टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया ऐतिहासिक मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

इंग्लंड विरुद्धच्या (India vs England) टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया ऐतिहासिक मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

इंग्लंड विरुद्धच्या (India vs England) टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया ऐतिहासिक मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

  • Published by:  News18 Desk

मँचेस्टर, 9 सप्टेंबर : इंग्लंड विरुद्धच्या  (India vs England) टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया ऐतिहासिक मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडियानं ही टेस्ट सीरिज जिंकली तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकणारा विराट कोहली (Virat Kohli) हा पहिला भारतीय कॅप्टन होईल. या टेस्टपूर्वी टीम इंडिया काळजीत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahanae) सध्या फॉर्मात नाही.

अजिंक्य रहाणे ओव्हलच्या अनुकूल पिचवर देखील अपयशी ठरला होता. सातपैकी सहा इनिंगमध्ये फेल गेल्यानं रहाणेचा आत्मविश्वास हरवलाय. त्यामुळे या टेस्टमध्ये रहाणेच्या जागी मुंबईकर बॅट्समन सूर्यकुमार यादवचा (Surykumar Yadav) टीममध्ये समावेश होऊ शकतो. सूर्यकुमार यादव  सध्या चांगलाच फॉर्मात असून त्याचा बुधवारी टी 20 वर्ल्ड कपसाठी जाहीर झालेल्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

बुमराहला मिळणार आराम

ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ओली पोप आणि जॉनी बेअरस्टो या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विराट कोहली विश्रांती देण्याची शक्यता आहे. बुमराहनं या सीरिजमध्ये टीम इंडियाकडून सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

बुमराहनं या सीरिजमध्ये सर्वाधिक 151 ओव्हर बॉलिंग केली आहे. अन्य कोणत्याही बॉलरनं 130 ओव्हर बॉलिंग केलेली नाही. यामध्ये त्यानं 21 च्या सरासरीनं 18 विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या टेस्टमध्ये मोहम्मद शमी खेळला नव्हता. त्यामुळे पाचव्या टेस्टमध्ये बुमराहला विश्रांती देऊन शमीचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. शमीनं या सीरिजमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर लॉर्ड्स टेस्टमध्ये नाबाद  56 रनची महत्त्वपूर्ण भागिदारी केली आहे.

शार्दुल- उमेश यादव खेळणार

गेल्या टेस्टमध्ये चांगली कामगिरी करणारा फास्ट बॉलर उमेश यादव (Umesh Yadav) आणि ऑल राऊंडर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांचा टीममध्ये समावेश नक्की मानला जात आहे. आर. अश्विनच्या जागी रविंद्र जडेजाला खेळवण्याचा निर्णय हा संपूर्ण नाही पण काही प्रमाणात यशस्वी झाला आहे.

पुजारा फिट, इंग्लंड रूटवर अवलंबून

चेतेश्वर पुजारानं प्रॅक्टीस सेशनमध्ये भाग घेतलेलं पाहून टीम इंडियाच्या फॅन्सना दिलासा मिळाला आहे. ओव्हल टेस्टच्या दरम्यान त्याला दुखापत झाली होती. दुसरिकडं इंग्लंडची संपूर्ण भिस्त जो रूटवर असेल. या टेस्टमध्ये मोठी खेळी करत या मालिकेत 600 रन करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. रुटला जोस बटलरची साथ मिळेल. बेअरस्टोच्या जागी त्याचा समावेश होऊ शकतो. तर मार्कवूड आणि ख्रिस वोक्स यांच्यावर बॉलिंगची भिस्त असेल.

धोनीची नियुक्ती होताच गावसकरांनी व्यक्त केली भीती! 17 वर्षांपूर्वीच्या घटनेचं दिलं उदाहरण

भारताची संभाव्य टीम : केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे/सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा/आर अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

First published:

Tags: Cricket, India vs england