मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: मँचेस्टरमध्ये अश्विनचा खास रेकॉर्ड, विराट कोहली देणार का संधी?

IND vs ENG: मँचेस्टरमध्ये अश्विनचा खास रेकॉर्ड, विराट कोहली देणार का संधी?

 भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमधील शेवटची टेस्ट मँचेस्टरमध्ये खेळली जाणार आहे. या टेस्टमध्ये तरी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) दिग्गज स्पिनर रविचंद्रन अश्विनला (R Ashwin) संधी देणार का? हा मोठा प्रश्न आहे.

पुढे वाचा ...

मँचेस्टर, 10 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमधील शेवटची टेस्ट मँचेस्टरमध्ये खेळली जाणार आहे. या टेस्टमध्ये तरी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) दिग्गज स्पिनर रविचंद्रन अश्विनला (R Ashwin) संधी देणार का? हा मोठा प्रश्न आहे. या सीरिजमधील पहिल्या चारही टेस्टमध्ये अश्विनला बेंचवर बसावं लागलं आहे. त्याच्या जागी रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) खेळवण्यात आलंय. अश्विनचं चार वर्षानंतर टी20 टीममध्ये पुनरागमन झालंय. आता त्यापाठोपाठ त्याला या सीरिजमध्ये खेळायला मिळणार का? हा प्रश्न आहे.

मँचेस्टरमध्ये या टीममधील विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, अश्विन आणि जडेजा यांनाच खेळण्याचा अनुभव आहे. या मैदानावर 2014 साली टीम इंडियानं शेवटची टेस्ट खेळली होती. त्यामध्ये इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रननं विजय मिळवला होता. त्या टेस्टमध्ये भारताची पहिली इनिंग 152 रनवरच संपुष्टात आली होती. मुरली विजय, कोहली, जडेजा आणि पुजारासह सहा जणांना खातं उघडण्यातही अपयश आले होते.

भारतानं त्या टेस्टमध्ये 4 विकेट्स फक्त 8 रनवर गमावल्या होत्या. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि अश्विन यांनी पार्टनरशिप करत टीमला 100 चा आकडा ओलांडून दिला. धोनीनं 71 रनची खेळी केली होती. तर अश्निननं 42 बॉलमध्ये 40 रन काढले होते.

इंग्लंडचा कॅप्टन जो रूट आणि फास्ट बॉलर ख्रिस वोक्सचा या मैदानात चांगला रेकॉर्ड आह. रूटनं इथं 8 टेस्टमध्ये 65 च्या सरासरीनं 781 रन काढले आहेत. इथं त्यानं एक द्विशतकही झळकावलं आहे. तर वोक्सनं 5 टेस्टमध्ये 23 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाला या दोघांपासून सावधान राहावं लागेल. त्याचबरोबर मोईन अलीनं 3 टेस्टमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडियाच्या निवडीनंतर रवी शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया, धोनीबद्दल म्हणाले..

या टेस्ट सीरिजमध्ये अश्विनच्या जागी जडेजाला खेळवण्याचा कोहलीचा रेकॉर्ड पूर्णपणे नाही पण काही प्रमाणात नक्कीच यशस्वी झाला आहे. मात्र त्याचवेळी ओव्हल टेस्टमध्ये शार्दुल ठाकूरनं ओव्हल टेस्टमध्ये चांगली बॅटींग करत जडेजावरील भार हलका केला आहे. त्यामुळे शेवटच्या टेस्टमध्ये जडेजाच्या जागी अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england