मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: ओव्हल टेस्ट कोण जिंकणार? VVS लक्ष्मणनं केली भविष्यवाणी

IND vs ENG: ओव्हल टेस्ट कोण जिंकणार? VVS लक्ष्मणनं केली भविष्यवाणी

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ओव्हलमध्ये सुरू असलेली चौथी  टेस्ट (India vs England 4th Test) सध्या रंगतदार अवस्थेत आहे. टीम इंडियाचा माजी बॅट्समन व्ही.व्ही. एस. लक्ष्मण (VVS Laxman) यानं ही मॅच कोण जिंकणार यांची भविष्यवाणी केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

ओव्हल, 4 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ओव्हलमध्ये सुरू असलेली चौथी  टेस्ट (India vs England 4th Test) सध्या रंगतदार अवस्थेत आहे. या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवसाअखेरीस टीम इंडियानं सावध सुरुवात करत  बिनबाद 43 रन केले आहेत. दुसऱ्या दिवसचा खेळ संपला तेव्हा केएल राहुल (KL Rahul) 22 आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 20 रन काढून नाबाद होते. इंग्लंडकडं अजूनही 56 रनची आघाडी आहे. यापूर्वी इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 290 रन केले.

टीम इंडियाचा माजी बॅट्समन व्ही.व्ही. एस. लक्ष्मण (VVS Laxman) यानं  ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवसानंतरच ही मॅच कोण जिंकणार यांची भविष्यवाणी केली आहे. 'क्रिकइन्फो' शी बोलताना लक्ष्मणनं सांगितलं की, ' माझ्यामते टीम इंडियाच्या बॅटींग ऑर्डरमधील प्रत्येक जण मोठी खेळी करण्यासाठी उत्सुक आहे. ते सर्व वर्ल्ड क्लास खेळाडू आहेत. ते चांगलं खेळतील असा मला विश्वास आहे. ही टेस्ट भारत जिंकेल असा माझा अंदाज आहे.' असं भविष्य लक्ष्मणनं व्यक्त केलं आहे.

'भारतीय टीमनं शनिवारी चांगली बॅटींग केली नाही तर ती खरोखरच निराशाजनक घटना असेल. कारण तुम्हाला इंग्लंडमध्ये सध्या तरी याच्यापेक्षा कोणतेही फ्लॅट पिच मिळणार नाही. त्यांनी या संधीचा फायदा उचलला नाही तर मोठी निराशा होईल,' असंही लक्ष्मण यावेळी म्हणाला.

ओव्हलवर चौथ्या इनिंगमध्ये सर्वाधिक रेकॉर्ड करण्याचा रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावावर आहे. 1979 साली इंग्लंड दौऱ्यात भारतीय टीमनं 8 आऊट 429 रन करत ती टेस्ट ड्रॉ केली होती. सुनील गावसकरांनी तेव्हा 221 रनची मॅरेथॉन इनिंग खेळली होती.

बांगलादेशचा न्यूझीलंडवर पुन्हा विजय, ऑस्ट्रेलियाला बसला मोठा फटका

ओव्हलच्या मैदानात इंग्लंडची टीमनं चौथ्या इनिंगमध्ये 263 रन करत मॅच जिंकली आहे. पण ही 1902 सालातील घटना आहे. याशिवाय इंग्लंडनं दोन वेळा चौथ्या इनिंगमध्ये 300 पेक्षा जास्त रन केले आहेत. पण तेव्हा त्या टेस्ट ड्रॉ झाल्या. त्यामुळे लक्ष्मणची भविष्यवाणी खरी ठरवण्यासाठी टीम इंडियानं ओव्हल टेस्टचा तिसरा दिवस खेळून काढणे आवश्यक आहे. टीम इंडियानं 250 पेक्षा जास्त आघाडी घेतली तर ही मॅच जिंकण्याची मोठी संधी त्यांना असेल.

First published:

Tags: Cricket news, India vs england