Home /News /sport /

IND vs ENG: प्रचंड त्रास होत असूनही रोहितनं केलं शतक पूर्ण! Photo पाहून वाटेल अभिमान

IND vs ENG: प्रचंड त्रास होत असूनही रोहितनं केलं शतक पूर्ण! Photo पाहून वाटेल अभिमान

रोहित शर्माचे (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेटमधील भारताबाहेरचे पहिले शतक हे तिसऱ्या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. रोहितच्या शतकानंतरचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो फोटोपाहून तुमचा रोहितबद्दलचा आदर आणखी वाढणार आहे.

  ओव्हल, 5 सप्टेंबर : ओव्हल टेस्टमध्ये (India vs England 4th Test) बॅकफुटवर असलेल्या टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस मॅचमध्ये पुनरागमन केलं आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय बॅट्समननं जबाबदारीनं खेळ करत या इंग्लंडच्या बॉलर्सवर वर्चस्व गाजवलं. रोहित शर्माचे (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेटमधील भारताबाहेरचे पहिले शतक हे तिसऱ्या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. रोहितनं 204 बॉलमध्ये 12 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं हे शतक झळकावलं. रोहितनं दुसऱ्या इनिंगमध्ये तब्बल 353 मिनिटे किल्ला लढवला. ओव्हलच्या पिचवर इंग्लंडच्या फास्ट बॉलर्सचा त्यानं सुरुवातीला संयमानं सामना केला. त्यानंतर पिच बॅटींगसाठी अनुकूल झाल्यानंतर फटकेबाजी देखील केली. मोईन अलीला सिक्स लगावत रोहितनं भारताबाहेरच्या शतकाची प्रतीक्षा संपवली. रोहितच्या या खेळानंतरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral) झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या फॅन (mumbaiindian_fc) या हँडलच्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये रोहितच्या दोन्ही मांड्या दिवसभर खेळून सुजल्या आहेत. 'रोहित शर्मानं लवकर फिट व्हावं.  या प्रकारचा त्रास असूनही खेळणे ही खरोखरच अवघड गोष्ट आहे. ही फॅन म्हणून सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे,' या आशयाचं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.
  रोहित शर्मा इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकं करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. रोहितच्या नावावर इंग्लंडमध्ये 9 शतकं आहेत. याआधी राहुल द्रविडच्या नावावर इंग्लंडमध्ये 8 शतकं होती. रोहितने इंग्लंडमध्ये 9 शतकं करण्याच्या व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रिचर्ड्स यांच्या नावावर वनडे आणि टेस्टमध्ये इंग्लंडमध्ये 9 शतकं आहेत. आता रोहितच्या पुढे फक्त डॉन ब्रॅडमन आहेत, ज्यांनी इंग्लंडमध्ये 11 शतकं केली.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma

  पुढील बातम्या