Home /News /sport /

IND vs ENG: पुजाराच्या संयमी बॅटींगनं इंग्लंड संतप्त! लाजीरवाण्या घटनेचा VIDEO VIRAL

IND vs ENG: पुजाराच्या संयमी बॅटींगनं इंग्लंड संतप्त! लाजीरवाण्या घटनेचा VIDEO VIRAL

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्या पार्टनरशिपमुळे भारताची स्थिती मजबूत झाली आहे. पुजारानं संयमी खेळ करत इंग्लंडच्या बॉलर्सला चांगलेच त्रस्त केले.

    ओव्हल, 5 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात ओव्हलवर होत असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियानं पुनरागमन केलं आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्या पार्टनरशिपमुळे भारताची स्थिती मजबूत झाली आहे. रोहितनं 127 रन काढले. तर पुजारानं 61 रनची खेळी केली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताने 3 आऊट 270 रन केले आहेत. पुजारानं तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या बॉलर्सना चांगलंच त्रस्त केलं. इंग्लंडचा फास्ट बॉलर क्रेग ओवरटननं पुजारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो यशस्वी झाला नाही. पुजारानं त्याच्या बॉलिंगवर चांगले रन जमवले. त्याची बॅटींग पाहून ओवरटनचा राग अनावर झाला होता. ओवरटननं हा राग पुजारावर काढला. याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. ओवरटननं टाकलेल्या 49 व्या ओव्हरमध्ये पुजारानं 2 फोर लगावले. त्यामुळे तो संतप्त झाला होता. त्यानंतर त्या ओव्हरमधील चौथा बॉलर टाकताना तो चांगलाच नर्वस झाला होता. ओवरटनचा तो बॉल पुजारानं अगदी शांतपणे बचावात्मक पद्धतीनं खेळून काढला. ओवरटननं तो बॉल अडवला आणि नंतर त्यानं पुजाराच्या दिशेनं बॉल उगारला. असं करत त्यानं पुजाराला घाबरवण्याचा प्रयत्न केला. याचा पुजारावर काहीही परिणाम झाला नाही. पण ओवरटन सध्या चांगलाच ट्रोल होत आहे. Tokyo Paralympics मध्ये भारताला पाचवे गोल्ड, कृष्णा नागरची सुवर्ण भरारी! रोहित आणि पुजारा यांच्यामध्ये 150 रनची पार्टनरशीप झाली. इंग्लंडच्या टीमने नवीन बॉल घेतल्यानंतर लगेचच एकाच ओव्हरमध्ये भारताच्या दोन विकेट गेल्या. ओली रॉबिनसनने रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराला आऊट केलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली 22 रनवर आणि रविंद्र जडेजा 9 रनवर नाबाद खेळत होते. भारताची आघाडी आता 171 रनपर्यंत पोहोचली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england

    पुढील बातम्या