• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG: विराट कोहलीला आज 6 रेकॉर्डसची संधी, सचिन-पॉन्टिंगला टाकणार मागे!

IND vs ENG: विराट कोहलीला आज 6 रेकॉर्डसची संधी, सचिन-पॉन्टिंगला टाकणार मागे!

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकाची प्रतीक्षा बऱ्याच काळापासून क्रिकेट फॅन्स करत आहेत. आता हेडिंग्ले टेस्टमध्ये सहा मोठे रेकॉर्ड करण्याची विराटला संधी आहे.

 • Share this:
  हेडिंग्ले, 28 ऑगस्ट : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकाची प्रतीक्षा बऱ्याच काळापासून क्रिकेट फॅन्स करत आहेत. हेडिंग्ले टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस विराट कोहली 45 रन काढून खेळत आहे. टीम इंडियाची पहिली इनिंग फक्त 78 रनवर संपुष्टात आली होती. तर इंग्लंडनं 432 रन केले होते.  आता दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियानं 2 आऊट 215 रन काढले आहेत. चौथ्या दिवशी विराट बॅटींगला उतरेल त्यावेळी त्याला 6 मोठ्या रेकॉर्डची संधी आहे.
  1. विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (टेस्ट, वन-डे आणि टी20) 489 इनिंगमध्ये 55 च्या सरासरीनं 22989 रन केले आहेत. त्याला आता 23 हजार रनचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 11 रनची गरज आहे. तो सर्वात कमी इनिंगमध्ये हा रेकॉर्ड करणारा बॅट्समन होईल. सचिन तेंडुलकरनं 522 इनिंगमध्ये हा पराक्रम केला होता. सचिन, आणि राहुल द्रविडनंतर हा रेकॉर्ड करणारा विराट हा तिसरा भारतीय असेल.
  2. कोहलीनं या इनिंगमध्ये 102 रन काढले तर त्याचे इंग्लंडमध्ये 1000 रन पूर्ण होतील. तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांच्यानंतर ही कामगिरी करणारा चौथा भारतीय होईल.
  3. कोहलीच्या टेस्ट कारकिर्दीचा विचार केला तर त्यानं विदेशात 3874 रन केले आहेत. यामध्ये 14 शतक आणि 13 अर्धशतकाचा समावेश आहे. त्यानं शनिवारी आणखी 126 रन केले तर 4 हजार रन पूर्ण होतील. यापूर्वी सचिन, द्रविड, गावसकर, लक्ष्मण आणि गांगुलीनं ही कामगिरी केली आहे.
  4. विराटनं इंग्लडमधील तीन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 2498 रन केले आहेत. त्याला आता 2500 रनचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 2 रनची गरज आहे. कोहलीच्यापूर्वी  क्रिकेट विश्वातील फक्त 3 बॅट्समननी हा रेकॉर्ड केला आहे.
  IND vs ENG: 'हे लीड्स आहे...कोलकाता नाही! इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा टीम इंडियाला इशारा
   5.  विराट कोहलीनं कॅप्टन म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 41 शतक झळकावले असून तो ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगसह संयुक्तपणे आघाडीवर आहे. पॉन्टिंगला मागं टाकण्यासाठी त्याला आणखी 55 रनची गरज आहे. 6.  विराटनं कॅप्टन म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 129 मॅच जिंकल्या आहेत. टीम इंडियानं तिसरी टेस्ट जिंकली तर तो 130 छा टप्पा गाठेल. विराटच्यापूर्वी फक्त 4 बॅट्समननं 130 पेक्षा जास्त मॅच जिंकल्या आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: