मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : फ्लॉप विराटच्या जागेवर खेळवण्यासाठी आहेत 2 पर्याय, रोहित शर्मा धाडस करणार का?

IND vs ENG : फ्लॉप विराटच्या जागेवर खेळवण्यासाठी आहेत 2 पर्याय, रोहित शर्मा धाडस करणार का?

विराट कोहलीनं (Virat Kohli) दुसऱ्या सामन्यात फक्त 1 रन काढला. फॉर्मात नसलेल्या विराटच्या जागेवर खेळवण्यासाठी टीम इंडियाकडं दोन पर्याय आहेत.

विराट कोहलीनं (Virat Kohli) दुसऱ्या सामन्यात फक्त 1 रन काढला. फॉर्मात नसलेल्या विराटच्या जागेवर खेळवण्यासाठी टीम इंडियाकडं दोन पर्याय आहेत.

विराट कोहलीनं (Virat Kohli) दुसऱ्या सामन्यात फक्त 1 रन काढला. फॉर्मात नसलेल्या विराटच्या जागेवर खेळवण्यासाठी टीम इंडियाकडं दोन पर्याय आहेत.

मुंबई, 10 जुलै : भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्या एजबस्टनमध्ये झालेली दुसरी टी20 टीम इंडियानं जिंकत तीन सामन्यांची मालिका खिशात टाकली आहे. दोन्ही सामन्यामध्ये बॅटर आणि बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. नॉटिंघममध्ये तिसरा टी20 सामना खेळला जात आहे. टीम इंडिया मालिकेत 2-0 नं आघाडीवर आहे. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये बदल केले जाऊ शकतात. या सामन्यात सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या तरूण खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

भुवनेश्वर कुमार इंग्लंड विरूद्धच्या टी20 सीरिजमध्ये फॉर्मात आहे. त्यानं दोन्ही पॉवर प्लेमध्ये जोरदार बॉलिंग केली. दुसऱ्या मॅचमध्ये तर त्यानं 'पॉवर प्ले'मध्ये 2 विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं आहे. त्याला या मॅचमध्ये बुमराहनं चांगली साथ दिली. आता तिसऱ्या सामन्यात दोघांपैकी एकाला विश्रांती मिळू शकते. भुवी दोन सामने खेळला आहे. त्यामुळे त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता जास्त आहे.

टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम मॅनेजमेंट सर्व प्रकारचे कॉम्बिनेशन तपासणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भुवनेश्वरच्या जागी आवेश खान किंवा उमरान मलिकला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते. तर स्पिन डिपार्टमेंटमध्येही बदल होण्याची शक्यता असून युजवेंद्र चहलच्या जागी रवी बिश्नोईला संधी मिळू शकते. चहलनं दुसऱ्या सामन्यात 10 रन देत 2 विकेट्स घेतल्या होत्या.

विराटची काळजी

बॅटींगमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मची रोहितसह संपूर्ण मॅनेजमेंटला काळजी आहे. त्यानं 5 महिन्यानंतर शनिवारी टी20 इंटरनॅशनल सामना खेळला. पण, त्यामध्ये तो फक्त 1 रन काढून आऊट झाला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराटनं 76 इनिंगमध्ये एकही शतक झळकावलेलं नाही. दुसऱ्या टी20 सामन्यात त्याला जबरदस्त फॉर्मात असलेल्या दीपक हु़डाच्या जागी संधी मिळाली होती. हुडा तिसऱ्या सामन्या टीममध्ये परत येऊ शकतो. पण, त्या परिस्थितीमध्ये विराटला ओपनिंग करावी लागेल तरच हुडाला तिसऱ्या क्रमांकावर बॅटींग करता येईल.

Sunil Gavaskar Birthday : .. तर क्रिकेटर नाही मासेमार बनले असते गावसकर!

दुसऱ्या टी20 सामन्यात ऋषभ पंतनं रोहित शर्मासह इनिंगची सुरूवात केली होती. पंतनं 16 बॉलमध्ये 25 रन काढले. पंतला यापुढेही टॉप ऑर्डरमध्ये खेळवणार का? हा प्रश्न आहे. टॉप ऑर्डरसाठी इशान किशन हा आणखी एक पर्याय टीम इंडियाकडं आहे. इशाननं दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टी20 सीरिजमध्ये रोहित आणि राहुलच्या अनुपस्थितीमध्ये ओपनरची भूमिका पार पाडली होती. आयर्लंड दौऱ्यातही तो ओपनर होता. त्यामुळे विराटसाठी हुडा प्रमाणेच इशान किशन हा एक पर्याय कॅप्टनकडं आहे. आता कॅप्टन रोहित शर्मा विराटला वगळण्याचं धाडस दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma, Virat kohli