रोहित शर्माला विदेशात पहिले टेस्ट शतक झळकावण्याची संधी होती. रोहित गेल्या 15 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. पण विदेशातील टेस्ट मॅचमध्ये त्याचं एकही शतक नाही. लॉर्ड्स मैदानावर भारतीय ओपनरनं 31 वर्षांपूर्वी शतक झळकावले होते. IND vs ENG : ऐतिहासिक लॉर्ड्सवर रोहितचं शतक हुकलं, अँडरसनच्या अप्रतिम बॉलनं केला घात टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीनं (Ravi Shastri) 1990 साली ओपनिंगला येत लॉर्ड्सवर शतक झळकावले होते. त्यानंतर रोहितला या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी होती. पण त्याचे शतक 17 रननं हुकले.If I am feeling so disappointed, I can just imagine what @ImRo45 must be feeling. It was such a superb effort and #rohit looked all set for a well deserved ton. #RohitSharma pic.twitter.com/KFcPSm8suJ
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) August 12, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Rohit sharma