लॉर्ड्स, 12 ऑगस्ट : टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन केएल राहुलनं (KL Rahul) लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावलं आहे. राहुलनं नॉटिंघम टेस्टमध्ये 84 रनची खेळी केली होती. त्यानं तोच फॉर्म कायम ठेवत लॉर्ड्सवर शतक झळकावलं. राहुलचं टेस्ट क्रिकेटमधील हे सहावं शतक असून लॉर्ड्स टेस्टमध्ये शतक झळकावणारा रा्हुल दहावा भारतीय बॅट्समन बनला आहे.
केएल राहुलला मयंक अग्रवाल जखमी झाल्यानं संधी मिळाली आहे. दोन वर्षानंतर टीममध्ये परतलेल्या राहुलनं नॉटिंघम टेस्टमध्ये अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर राहुलनं सलग दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली. राहुल आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) जोडीनं शतकी पार्टनरशिप केली.
रोहित-राहुल जोडीनं सुरुवात सावध केली. त्यानंतर रोहित शर्मानं सॅम करनला पाच चौकार लगावत वेगानं रन जमावण्यास सुरूवात केली. मात्र त्यानंतरही राहुलनं संयमी खेळ केला. 38 वी टेस्ट खेळणाऱ्या राहुलनं पहिल्या 107 बॉलमध्ये एकही फोर लगावला नाही. अखेर 108 व्या बॉलवर मोईन अलीला त्यानं पहिला चौकार लगावला.
What an innings!
Test century No.6 for KL Rahul 👏👏#WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT86mZ0z pic.twitter.com/wTsKAdNuqX — ICC (@ICC) August 12, 2021
IND vs ENG : सौरव गांगुली लॉर्ड्सवर दाखल, रवी शास्त्रीच्या भवितव्याचा होणार फैसला
रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर राहुलनं मॅचची सूत्र हाती घेतली. त्यानं 137 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. यामध्ये त्यानं दोन फोर आणि एक सिक्स लगावला. चेतेश्वर पुजारा आऊट झाल्यानंतर राहुलनं कॅप्टन विराट कोहलीसोबत चांगली पार्टनरशिप केली. टीम इंडियानं लॉर्ड्सच्या मैदानात आजवर 18 टेस्ट खेळल्या असून त्यापैकी फक्त 2 टेस्ट जिंकल्या आहेत. यंदा लॉर्ड्स टेस्टमध्ये रोहित शर्मा आणि राहुलच्या चांगल्या खेळीनं टीम इंडियानं चांगली सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Kl rahul