मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 'राहुलचं हे रुप कधीही पाहिलं नाही', रोहित शर्मानं दिला इंग्लंडला इशारा

IND vs ENG : 'राहुलचं हे रुप कधीही पाहिलं नाही', रोहित शर्मानं दिला इंग्लंडला इशारा

इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs England) केएल राहुल (KL) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्मानं (Rohit Sharma) राहुलबाबत यजमान टीमला एक गंभीर इशारा दिला आहे.

लॉर्ड्स, 13 ऑगस्ट : इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs England) केएल राहुल (KL) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राहुलनं नॉटिंघम टेस्टमध्ये 84 रनची खेळी केली होती. त्यापाठोपाठ लॉर्ड्स टेस्टमध्ये शतक झळकावलं आहे. राहुल पहिल्या दिवसाच्या अखेर 127 रन काढून नाबाद आहे. राहुलनं पहिल्या दिवशी रोहित शर्मासोबत 126 रनची पार्टनरशिप केली. या जोडीनं टीम इंडियाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्मानं राहुलबाबत यजमान टीमला एक गंभीर इशारा दिला आहे.

रोहितनं पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितलं की, 'माझ्या मते ही राहुलची बेस्ट इनिंग आहे. यापेक्षा चांगलं खेळताना मी त्याला कधीही पाहिलं नाही. त्याचं खेळावर पूर्ण नियंत्रण होतं. तो कोणतीही चूक करत नव्हता. त्याच्या डोक्यात प्लॅन पक्का होता. त्याला त्या प्लॅनवर विश्वास होता. त्यानं त्याचपद्धतीनं खेळ केला. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवसाचा राहुलनं चांगला फायदा उठवला.' असे रोहित यावेळी म्हणाला.

रोहितनं यावेळी इंग्लंडला इशारा देखील दिला आहे. 'आम्ही दोघांनी एकत्र बऱ्याचदा बॅटींग केली आहे. आम्हाला परस्परांचा खेळ माहिती आहे. आम्ही बॅटींग करताना नेहमी एकमेकांशी चर्चा करतो. त्यामुळे आमच्यात समन्वय साधणे सोपे होते. माझी आणि राहुलची विचार करण्याची पद्धत सारखी आहे. मला आशा आहे की तो दुसऱ्या दिवशी द्विशतक पूर्ण करेल.' अशी भविष्यवाणी करत रोहितनं यजमान टीमला इशारा दिला आहे.

IND vs ENG : विराटला जाळ्यात कसं अडकवलं? इंग्लंडच्या बॉलरनं सांगितलं रहस्य!

राहुलनं केली सेहवागची बरोबरी

केएल राहुलनं आशिया खंडाच्या बाहेर शतक झळकावण्यात वीरेंद्र सेहवागची (Virendra Sehwag) बरोबरी केली आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुलनं सेहवागच्या दुप्पट वेगानं ही कमाल केली आहे. सेहवागनं आशिया खंडाच्या बाहेर 59 इनिंगमध्ये 4 शतक झळकावले होते. तर राहुलनं 28 इनिंगमध्येच ही कमाल केली आहे. आशिया खंडाच्या बाहेर सर्वात जास्त शतक झळकावण्याचा विक्रम सुनील गावसकरांच्या नावावर आहे. त्यांनी 15 शतक झळकावली आहेत.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Kl rahul, Rohit sharma