मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : लॉर्ड्स टेस्टच्या शेवटच्या दिवशी 'या' 3 जणांवर असेल टीम इंडियाची भिस्त

IND vs ENG : लॉर्ड्स टेस्टच्या शेवटच्या दिवशी 'या' 3 जणांवर असेल टीम इंडियाची भिस्त

नॉटिंघम टेस्टचा विजय पावसामुळे हुकल्यानं टीम इंडियाला आता लॉर्ड्स टेस्ट जिंकून (India vs England 2nd Test) 5 टेस्टच्या सीरिजमध्ये आघाडी घेण्याची संधी आहे.

नॉटिंघम टेस्टचा विजय पावसामुळे हुकल्यानं टीम इंडियाला आता लॉर्ड्स टेस्ट जिंकून (India vs England 2nd Test) 5 टेस्टच्या सीरिजमध्ये आघाडी घेण्याची संधी आहे.

नॉटिंघम टेस्टचा विजय पावसामुळे हुकल्यानं टीम इंडियाला आता लॉर्ड्स टेस्ट जिंकून (India vs England 2nd Test) 5 टेस्टच्या सीरिजमध्ये आघाडी घेण्याची संधी आहे.

लॉर्ड्स, 16 ऑगस्ट : नॉटिंघम टेस्टचा विजय पावसामुळे हुकल्यानं टीम इंडियाला आता लॉर्ड्स टेस्ट जिंकून (India vs England 2nd Test) 5 टेस्टच्या सीरिजमध्ये आघाडी घेण्याची संधी आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताकडे 154 रनची आघाडी असून आणखी 4 विकेट्स शिल्लक आहेत. आता पाचव्या दिवशी ही टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियाची भिस्त 3 खेळाडूंच्या कामगिरीवर असेल.

ऋषभ पंत

टीम इंडियाला लॉर्ड्स टेस्ट जिंकायची असेल तर ऋषभ पंतला (Rishabh Pant) शेवचच्या दिवशी मोठी खेळी करणे आवश्यक आहे. पंतनं चौथ्या दिवशी 29 बॉलचा सामना करुन 14 रन काढले आहे. पंतनं पाचव्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये चांगली बॅटींग केली तर टीम इंडियाला मोठी लीड मिळू शकेल.

रविंद्र जडेजा

लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या दिवशी मोईन अलीनं 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं शेवटच्या सत्रात अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजाला परत पाठवले. मोईन अलीला पिचकडून मदत मिळत असल्यानं रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) बॉलिंग  पाचव्या दिवशी महत्त्वाची ठरणार आहे. जडेजानं चौथ्या इनिंगमध्ये चांगली बॉलिंग करत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. पण ते विजय भारतीय पिचवर आहेत. आता लॉर्ड्सवर जडेजाला कमाल करण्याची संधी आहे.

IPL 2021 : अफगाणिस्तानचे खेळाडू आयपीएल खेळणार का? SRH नं दिलं उत्तर

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयात सिराजचं (Mohammed Siraj) मोलाचं योगदान होते. आता लॉर्ड्समध्येही टीम इंडियाला जिंकण्यासाठी त्याची बॉलिंग निर्णायक ठरु शकते. सिराजचा हा पहिलाच इंग्लंड दौरा आहे. पण, त्यानं या दौऱ्यात सर्वांना प्रभावित केले आहे. पहिल्या इनिंगमध्य चार विकेट्स घेणाऱ्या सिराजकडून दुसऱ्या इनिंगमध्येही तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. सिराजकडं चांगला वेग तसंच लाईन आणि लेन्थ आहे. त्याच्या बळावर इंग्लंडची बॅटींग उद्धवस्त करण्याची त्याची क्षमता आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs england