मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : लॉर्ड्सशी नातं सांगणारे Photos गांगुलीनं केले शेअर, दादाच्या कॅप्शननं जिंकलं फॅन्सचं मन

IND vs ENG : लॉर्ड्सशी नातं सांगणारे Photos गांगुलीनं केले शेअर, दादाच्या कॅप्शननं जिंकलं फॅन्सचं मन

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट (India vs England 2nd Test) पाहण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) लॉर्ड्सवर दाखल झाले आहेत. या मैदानाशी गांगुलीचं खास कनेक्शन आहे.

  • Published by:  News18 Desk
लॉर्ड्स, 13 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट (India vs England 2nd Test) पाहण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) लॉर्ड्सवर दाखल झाले आहेत. या मैदानाशी गांगुलीचं खास कनेक्शन आहे. गांगुलीनं 25 वर्षांपूर्वी लॉर्ड्सवरच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याच मैदानात इंग्लंडचा पराभव करुन नेटवेस्ट ट्रॉफी उंचावली होती. लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट काढून हवेत फिरवणाऱ्या गांगुलीचा जल्लोष आजही क्रिकेट फॅन्सच्या लक्षात आहे. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी गांगुलीला मैदानात पाहताच क्रिकेट फॅन्सच्या या सर्व आठवणी जाग्या झाल्या आहेत. सौरव गांगुलीनं लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवसाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. गांगुलीनं लॉर्ड्स मैदानातील काही खास फोटो शेअर करत म्हंटलं आहे की, 'मी इथं सर्वात प्रथम 1996 साली एक खेळाडू म्हणून आलो होतो. त्यानंतर कॅप्टन म्हणून आलो. आज प्रशासक या नात्यानं खेळाचा आनंद घेतला. भारत तेव्हा देखील चांगल्या स्थितीमध्ये होता. आजही भारताची परिस्थिती भक्कम आहे. क्रिकेटचा हा खेळ जबरदस्त आहे.' असं कॅप्शन गांगुलीनं या फोटोला दिलं आहे.
गांगुलीनं जे चार फोटो शेअर केले आहेत. त्यामधील पहिला फोटो पदार्पणातील टेस्टमध्ये झळकावलेल्या शतकाचा आहे. दुसऱ्या फोटोत तो कॅप्टन म्हणून दिसत आहे. तिसऱ्या फोटोत दादाच्या हातात नॅटवेस्ट ट्रॉफी आहे. तर चौथा फोटो लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवसाचा आहे. IND vs ENG : लॉर्ड्समधील शतकानंतर राहुलला मिळाली राजेशाही वागणूक, पाहा VIDEO शास्त्रीच्या भवितव्याचा होणार फैसला लॉर्ड्स टेस्टच्या दरम्यान सौरव गांगुली टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्रींशी चर्चा करणार आहे. एका रिपोर्टनुसार टी20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री तसंच त्यांचे सहकारी भरत अरूण, आर.श्रीधर आणि विक्रम राठोड हे पदभार सोडणार आहेत. शास्त्री आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफचा निर्णय लॉर्ड्स टेस्टच्या दरम्यानच होणार आहे.  गांगुलीसह बीसीसीआय सचिन जय शहा देखील लॉर्ड्समध्ये आहेत. ते दोघं या कालावधीमध्ये शास्त्रींशी चर्चा करतील.
First published:

Tags: Cricket news, India vs england, Sourav ganguly

पुढील बातम्या