मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : लॉर्ड्स टेस्टमध्ये इशांत शर्मा खेळणार की अश्विन ? वाचा संभाव्य Playing 11

IND vs ENG : लॉर्ड्स टेस्टमध्ये इशांत शर्मा खेळणार की अश्विन ? वाचा संभाव्य Playing 11

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट  (India vs England) गुरुवारपासून लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे. या टेस्टमध्ये इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या दोन अनुभवी बॉलर्सपैकी कोण खेळणार हा प्रश्न आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट (India vs England) गुरुवारपासून लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे. या टेस्टमध्ये इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या दोन अनुभवी बॉलर्सपैकी कोण खेळणार हा प्रश्न आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट (India vs England) गुरुवारपासून लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे. या टेस्टमध्ये इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या दोन अनुभवी बॉलर्सपैकी कोण खेळणार हा प्रश्न आहे.

  • Published by:  News18 Desk

लॉर्ड्स , 11 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट  (India vs England) गुरुवारपासून लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे. टीम इंडियानं नॉटिंघममध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये जोरदार कामगिरी केली होती. भारतीय बॉलर्सच्या प्रभावी कामगिरीमुळे टीमला मॅच जिंकण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, पावसामुळे टीम इंडियाला विजय मिळू शकला नाही. लॉर्ड्स टेस्टपूर्वी टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) जखमी झाला आहे. त्यामुळे शार्दुलच्या जागेवर इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या दोन अनुभवी बॉलर्समध्ये स्पर्धा आहे.

इशांत शर्माचा लॉर्ड्सवर रेकॉर्ड चांगला असल्यानं या शर्यतीमध्ये त्याचं पारडं जड आहे.  टीम इंडियानं 2014 साली लॉर्ड्सवर टेस्ट जिंकली होती. इशांत शर्मा त्या विजयाचा हिरो होता. 74 रन देत 7 विकेट्स ही इशांतची करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी याच मैदानावर आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर झालेल्या शेवटच्या तीन टेस्टमध्ये फास्ट बॉलर्सचं वर्चस्व राहिलं आहे. या तीन टेस्टमध्ये एकूण 111 विकेट्स पडल्या आहेत. त्यापैकी फक्त 10 विकेट्स स्पिनर्सला मिळाल्या आहेत. अश्विननं 2018 साली झालेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये 17 ओव्हर बॉलिंग केली होती. त्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.

जडेजा नक्की, मयंक फिट

नॉटिंघम टेस्टमध्ये अश्विनच्या ऐवजी जडेजाला पसंती देण्यात आली होती. जडेजानं लॉर्ड्सवर एकमेव टेस्ट 2014 साली खेळली होती. त्या टेस्टमध्ये त्यानं तीन विकेट्ससह दुसऱ्या इनिंगमध्ये 68 रनची खेळी केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून फॉर्मात असलेल्या जडेजानं नॉटिंघम टेस्टमध्ये 56 रन काढले होते. लॉर्ड्सवर टीम इंडिया चार फास्ट बॉलरसह उतरली तर एकमेव स्पिनर म्हणून जडेजा खेळणार हे नक्की आहे.

मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) दुसऱ्या टेस्टसाठी फिट झाला आहे. मंगळवारी त्याने नेटमध्ये सरावही केला. नॉटिंघम टेस्टआधी सराव करताना मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) टाकलेला बाऊन्सर मयंकच्या डोक्याला लागला, यानंतर त्याला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला, त्यामुळे मयंकऐवजी केएल राहुलला (KL Rahul) पहिल्या टेस्टमध्ये संधी देण्यात आली. राहुलनेही मिळालेल्या या संधीचं सोनं केलं. पहिल्या इनिंगमध्ये राहुलने 84 रनची खेळी केली, तर दुसऱ्या इनिंगमध्येही तो फॉर्ममध्ये दिसला.

'धोनीबद्दल काही बोललं तर देशात मला मारतील,' भारतीय क्रिकेटपटूचं वक्तव्य

मयंक अग्रवाल फिट झाल्यामुळे आता दुसऱ्या टेस्टमध्ये ओपनिंग कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मयंक अग्रवाल किंवा केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावरही खेळवलं जाऊ शकतं, कारण पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पहिल्या सत्रात पुजाराने 30 रनच्या सरासरीने बॅटिंग केली. नॉटिंघम टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही तो अपयशी ठरला.

भारताची संभाव्य टीम

रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल/चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा,आर अश्विन/ इशांत शर्मा,  मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

First published:

Tags: Cricket news, India vs england