लॉर्ड्स, 12 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्या टेस्ट सीरिजमध्ये पावसाचं विघ्न कायम आहे. नॉटिंघममध्ये दोन्ही देशांमध्ये झालेली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती. या टेस्टमधील पाचवा दिवस पावसामुळे पूर्ण वाया गेला. या पावसामुळेच टीम इंडियाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी हुकली. आता लॉर्ड्स टेस्टमध्येही पावसाचा अडथळा आला आहे.
लॉर्ड्स टेस्टमध्ये पावसामुळे टॉस उशीरा झाला. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं टॉस जिंकत, पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. या टेस्टपूर्वी टीम इंडियाला धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) जखमी झालाय. शार्दुलला स्नायूची दुखापत (hamstring injury) झाली आहे. त्यामुळे तो या टेस्टमध्ये खेळणार नाही. शार्दुल ठाकूरला त्याच्या बॅटींगमधील कौशल्यामुळे नॉटिंघम टेस्टमध्ये संधी देण्यात आली होती. तो नॉटिंघममध्ये शून्यावर आऊट झाला असला तरी त्यानं 4 विकेट्स घेत उपयुक्त बॉलिंग केली होती. शार्दुलच्या जागी अनुभवी इशांत शर्माचा (Ishant Sharma) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय टीम या सीरिजमध्ये 4 फास्ट बॉलरसह खेळणार असल्याचं विराट कोहलीनं यापूर्वीच जाहीर केले होते.
इंग्लंडलाही दुखापतीचं ग्रहण
इंग्लंडच्या टीमला दुखापतीचं ग्रहण लागलंय. इंग्लंडचा अनुभवी फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड दुखापतीमुळे या टेस्टमध्ये खेळणार नाही. ब्रॉडच्या जागी मार्क वूडचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड टीमनं या टीममध्ये तीन बदल केले आहे.
इंग्लंडनं टीममध्ये ऑल राऊंडर मोईन अलीचा समावेश केलाय. मोईन अली सध्या फॉर्मात असून त्याच्या समावेशानं इंग्लंडची बॅटींग मजबूत होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england