VIDEO:धोनी-विराटसमोर तरुणाने केलं तरुणीला प्रपोज,चहलने केलं अभिनंदन

अवघ्या स्टेडियमवर हा प्रेमळ क्षण स्टेडियमवर लावण्यात आलेल्या मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2018 07:18 PM IST

VIDEO:धोनी-विराटसमोर तरुणाने केलं तरुणीला प्रपोज,चहलने केलं अभिनंदन

इंग्लंड, 14 जुलै : लाॅडर्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान दुसरा एकदिवसीय सामना रंगलाय. मात्र, स्टेडियमवर एका तरुणाने आपल्या प्रेयसीला प्रपोज केल्याची मजेदार घटना घडलीये. या प्रेमीयुगुलांचा लाईव्ह प्रपोज सोहळा स्टेडियमवर मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला. जेव्हा या तरुणाने प्रपोज केलं तेव्हा काॅमेंट्री करणाऱ्यांनीही चांगलीच फिरकी घेतली आणि हा निर्णय पेंडिग असल्याचं दाखवलं. काही क्षणातच तरुणीने होकार देताच होकार दाखवण्यात आलाय.नंतर या प्रियकराने आपल्या प्रेयसीला अंगठी घातली.

स्टेडियमवर एक प्रेमी युगुल सामन्याचा आनंद लुटत होता. नेहमीप्रमाणे कॅमेऱ्यामॅनने जेव्हा स्टेडियमवर कॅमेरा फिरवला तेव्हा या तरुणाने आपल्या प्रेयसीला प्रपोज केलं. अवघ्या स्टेडियमवर हा प्रेमळ क्षण स्टेडियमवर लावण्यात आलेल्या मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला. इंग्लंड आणि टीम इंडियाचे खेळाडूही काही वेळ या प्रपोज सोहळ्यासाठी थांबले. जेव्हा तरुणीने तरुणाच्या प्रपोजला होकार दिला तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थितीत सर्वांना टाळ्यांचा कडकडाट केला. तर मैदानात युजवेंद्र चहलनेही टाळ्या वाजून या प्रेमी युगुलांचं अभिनंदन केलं.  लग्नाचा हा प्रपोजचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

LIVE #INDvENG 2nd ODI : इंग्लंडला अर्धा संघ तंबूत परतला

लॉर्ड्स या ऐतिहासिक मैदानावर याआधीही लग्नाला प्रपोज करण्याचा प्रसंग घडलाय. मागील वर्षी जेम्स एंडरसनने 500 विकेट घेतल्या होत्या तेव्हा एका तरुणाने आपल्या प्रेयसीला प्रपोज केलं होतं. आॅस्ट्रेलियामध्येही एशेज सिरीजमध्ये गाबामध्येही एक चाहत्याने आपल्या प्रेयसीला प्रपोज केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...