इंग्लंडविरुद्धच्या मॅच आमच्या स्टेडियममध्ये का नाही? BCCI वर क्रिकेट संघांची नाराजी

इंग्लंडविरुद्धच्या मॅच आमच्या स्टेडियममध्ये का नाही? BCCI वर क्रिकेट संघांची नाराजी

काहीच दिवसांपूर्वी इंग्लंड क्रिकेट टीमच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम (India vs England) जाहीर करण्यात आला. पण आता बीसीसीआय (BCCI) सोबत संलग्न असलेले राज्याचे क्रिकेट संघ या कार्यक्रमावर नाराज झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : काहीच दिवसांपूर्वी इंग्लंड क्रिकेट टीमच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम (India vs England) जाहीर करण्यात आला. पण आता बीसीसीआय (BCCI) सोबत संलग्न असलेले राज्याचे क्रिकेट संघ या कार्यक्रमावर नाराज झाले आहेत. त्यांच्या स्टेडियमना भारत-इंग्लंड सीरिजची एकही मॅच का देण्यात आली नाही, असा सवाल राज्याच्या क्रिकेट संघांनी विचारला आहे. इंग्लंडची टीम भारत दौऱ्यात एकूण 12 मॅच खेळणार आहे. या सगळ्या मॅच चेन्नई, पुणे आणि अहमदाबाद या तीन ठिकाणी होणार आहेत. 12 पैकी 7 मॅचचं आयोजन अहमदाबादमध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशन करणार आहे. कोरोना असल्यामुळे तीन स्टेडियममध्येच मॅच घेणार असल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मुंबई क्रिकेट संघ (MCA) या कार्यक्रमामुळे हैराण आहे. तसंच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने असं का केलं?, असा प्रश्न बंगाल क्रिकेट असोसिएशननेही विचारला आहे. वानखेडे स्टेडियममध्ये मागच्या चार वर्षांमध्ये एकही टेस्ट मॅच खेळवली गेली नाही, असं मुंबई क्रिकेट असोसिएशनचं म्हणणं आहे. तर भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या सीरिजच्या मॅच कोलकात्यामध्ये होऊ शकतात, असं गांगुली 28 सप्टेंबरला म्हणाला होता. आता बीसीसीआयच्या या वेळापत्रकावर क्रिकेट संघ उघडपणे नाराजी बोलून दाखवत आहेत.

कोरोना व्हायरसमुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली कोलकात्याला होणारी मॅच रद्द करण्यात आली होती, त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सीरिजच्या काही मॅच ईडन गार्डनवर होतील, असं बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक दालमिया काही सदस्यांना म्हणाले होते. पण आता कोलकात्याला एकही मॅच न मिळाल्यामुळे तेदेखील नाराज झाले आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज

5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2021- पहिली टेस्ट- चेन्नई

13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2021- दुसरी टेस्ट- चेन्नई

24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021- तिसरी टेस्ट (डे-नाईट)- अहमदाबाद

4 मार्च ते 8 मार्च 2021- चौथी टेस्ट- अहमदाबाद

टी-20 सीरिज

12 मार्च- पहिली टी-20- अहमदाबाद

14 मार्च- दुसरी टी-20- अहमदाबाद

16 मार्च- तिसरी टी-20- अहमदाबाद

18 मार्च- चौथी टी-20- अहमदाबाद

20 मार्च- पाचवी टी-20- अहमदाबाद

वनडे सीरिज

23 मार्च- पहिली वनडे- पुणे

26 मार्च- दुसरी वनडे- पुणे

28 मार्च- तिसरी वनडे- पुणे

Published by: Shreyas
First published: December 13, 2020, 12:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या