मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : विराटला केली सचिननं मदत, कारण समजल्यावर वाटेल मास्टर-ब्लास्टरचा अभिमान!

IND vs ENG : विराटला केली सचिननं मदत, कारण समजल्यावर वाटेल मास्टर-ब्लास्टरचा अभिमान!

विराटनं कोहलीला (Virat Kohli) अडचणीच्या काळात महान बॅट्समन सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) मदत केली  होती. विराटनं दिनेश कार्तिकला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 ऑगस्ट : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा सध्या जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे. विराटनं हे स्थान मोठ्या संघर्षानंतर मिळवलं आहे. 2014 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या करिअरमध्ये मोठा चढ-उतार झाला. या अडचणीच्या काळात विराटनं महान बॅट्समन सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) मदत केली  होती. विराटनं दिनेश कार्तिकला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

विराटसाठी 2014 चा इंग्लंड दौरा निराशाजनक ठरला. त्या दौऱ्यात त्यानं 10 इनिंगमध्ये 13.50 च्या सरासरीनं रन केले. त्यानंतर त्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुनरागमन केलं आणि 692 रन काढले. 'ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्यापूर्वी प्रत्येक विदेश दौरा मला इंजिनिअरिंगच्या परीक्षेसारखा वाटत असे. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मला पास व्हायचं होतं. या स्तरावरही मी खेळू शकतो, हे लोकांना मला दाखवायचं होतं.' असं विराटनं सांगितलं होतं.

खराब काळात सचिनची साथ

विराटनं त्या दिवसांतच्या आठवणीबद्दल पुढे सांगितलं की, " तुमच्या खराब काळात तुम्हाला कुणीही मदत करत नाही. त्यामुळे फक्त मेहनत करणे हा एकच पर्याय माझ्याकडे होता. मी त्यावेळी थोडा निराश होतो. पण माझ्याबरोबर कोण आहे आणि कोण नाही हे मला तेव्हा समजले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल जॉन्सन जबरदस्त फॉर्मात होता. मी त्याला डोळ्यासमोर ठेवून सराव केला.

Tokyo Olympics : 41 वर्षांनी आला ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये मेडल

मी मुंबईत देखील गेलो. सचिन तेंडुलकरला फोन केला. त्याचा सल्ला घेतला. माझा खेळ सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे. या स्तरावर क्रिकेट कसं खेळायला हवं हे सचिनला विचारलं. तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी नाही तर टीमला जिंकवण्यासाठी टेस्ट क्रिकेट खेळता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जास्तीत जास्त रन कसे काढले पाहिजेत याचाच विचार मी घरी करत असे. मी जिममध्ये व्यायाम करत असतानाही मिचेल जॉन्सनच्या बॉलिंगचा विचार करत असे. या तयारीमुळे माझी भीती गेली. मी बिनधास्तपणे खेळू लागलो. त्यानंतर सर्व गोष्टी सुरळीत घडल्या.' असे विराटने सांगितले.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Sachin tendulkar, Virat kohli