नॉटिंघम, 6 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st Test) यांच्यातील पाच टेस्टच्या मालिकेत विराट कोहलीची सुरुवात निराशाजनक झाली आहे. विराट अगदी पहिल्या बॉलवर आऊट (Golden Duck) होईल, अशी कल्पना इंग्लंडच्या टीमनं केली नसेल. विराटकडून टीम इंडियाला मोठी अपेक्षा होती. मात्र त्यानं निराशा केली. विराटची ही विकेट अन्य कुणी नाही तर इंग्लंडचा सर्वात अनुभवी फास्ट बॉलर जेम्स अँडरसननं (James Anderson) घेतली. अँडरसनच्या बाहेर जाणाऱ्या बॉलवर विराट फसला.
नॉटींघम टेस्टमध्ये भारतानं सुरुवात चांगली केली. रोहित शर्मा आणि के.एल. राहुल (Rohit Sharma- KL Rahul) या जोडीनं दुसऱ्या दिवशी सकाळी सावध सुरुवात केली. टीम इंडियाचा स्कोअर 1 आऊट 100 होता. त्यावेळी 41 वी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या अँडरसननं टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले. अँडरसननं त्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर चेतेश्वर पुजाराला आऊट केलं. त्यानंतर पुढच्याच बॉलवर विराटला ऑफ साईडच्या बाहेर जाणाऱ्या बॉलवर चकवलं. विराटनं तो बॉल बचावात्मक पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. बॉल विराटच्या बॅटच्या बाहेरच्या भागाला लागून विकेट किपर जोस बटलरच्या हातामध्ये विसावला.
Getting rid of Virat Kohli on golden duck is just massive, no wonder Jimmy was pumped up.pic.twitter.com/ZpcULtjr75
— Mani (@TweetsMani14) August 5, 2021
पहिली चकमक जिंकली
भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये विराट विरुद्ध अँडरसन यांच्यात होणाऱ्या लढाईकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. टेस्ट सीरिज सुरू व्हायच्या आधी विराटला अँडरसनचा सामना कसा करशील? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी विराटनं मी फक्त बॅटींग करेल असं उत्तर दिलं होतं.
Tokyo Olympics : बजरंगाची कमाल! शेवटच्या क्षणी फिरवली मॅच, सेमी फायनलमध्ये प्रवेश
विराटला 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात अँडरसननं चांगलंच त्रस्त केले होते. त्या दौऱ्यात अँडरसननं विराटला फक्त 50 बॉलमध्ये 4 वेळा आऊट केले. त्यानंतर 2018 साली झालेल्या दौऱ्यात विराटनं अँडरसनच्या 270 बॉलचा सामना करत 114 रन काढले. तसंच तो एकदाही अँडरसनकडून आऊट झाला नाही. आता 2021 मध्ये या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये तिसरी लढत सुरू झाली आहे. या लढतीमधील पहिली चकमक अँडरसननं जिंकलीय. आता विराट पुढील इनिंगमध्ये याला काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Virat kohli