मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, इंग्लंडला झटपट गुंडाळल्यानंतर भक्कम सुरूवात

IND vs ENG : पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, इंग्लंडला झटपट गुंडाळल्यानंतर भक्कम सुरूवात

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टच्या (India vs England 1 st Test) पहिल्या दिवसावर टीम इंडियानं वर्चस्व गाजवलं आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टच्या (India vs England 1 st Test) पहिल्या दिवसावर टीम इंडियानं वर्चस्व गाजवलं आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टच्या (India vs England 1 st Test) पहिल्या दिवसावर टीम इंडियानं वर्चस्व गाजवलं आहे.

  • Published by:  News18 Desk

नॉटिंघम, 4 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टच्या (India vs England 1 st Test) पहिल्या दिवसावर टीम इंडियानं वर्चस्व गाजवलं आहे. भारताच्या फास्ट बॉलर्सनी केलेल्या भेदक बॉलिंगमुळे इंग्लंडची पहिली इनिंग 183 रनवर संपुष्टात आली. त्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी शेवटच्या तासात भक्कम खेळ करत कोणतीही पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाच्या अखेर टीम इंडियानं बिनबाद 21 रन काढले आहेत. रोहित आणि राहुल हे दोघंही प्रत्येकी 9 रनवर नाबाद आहेत. आता या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेत दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याची संधी टीम इंडियाला आहे.

इंग्लंडची पडझड

त्यापूर्वी टीम इंडियाच्या भेदक बॉलिंगपुढे इंग्लंडची टीम मोठा स्कोअर करु शकली नाही. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) हा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमीनं 3 विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. शार्दूल ठाकूरनं 2 तर सिराजनं 1 विकेट घेत, या टेस्टसाठी त्यांची केलेली निवड योग्य ठरवली.

टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सनी सुरुवातीपासूनच इंग्लंडला धक्के दिले.  इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. रॉय बर्न्सला शून्यावरच बुमराहनं आऊट केलं. त्यानंतर झॅक क्राऊली देखील मोठा स्कोअर करु शकला नाही. त्याला सिराजनं 27 रनवर आऊट केले.

लंचनंतर मोहम्मद शमीनं इंग्लंडला तिसरा धक्का दिला. त्याने डॉम सिबलेला आऊट केलं. सिबले आऊट झाल्यानंतर कॅप्टन जो रुटनं (Joe Root) जॉनी बेअरस्टोच्या (Jonny Bairstow) मदतीनं इंग्लंडची इनिंग सावरली. रुटनं त्याचं अर्धशतक 89 बॉलमध्ये पूर्ण केल. तब्बल 12 इनिंगनंतर रुटला अर्धशतक झळकावण्यात यश आलं. रुटचं अर्धशतक पूर्ण होताच टीम इंडियानं इंग्लडला चौथा धक्का दिला. मोहम्मद शमीनं बेअरस्टोला आऊट करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. टी टाईमनंतर भारतीय बॉलर्सनी इंग्लंडवर वर्चस्व गाजवलं. मोहम्मद शमीनं डॅन लॉरेन्सला शून्यावर आऊट केलं. त्यानंतर बुमराहनं धोकादायक जोस बटलरलाही शून्यावर आऊट केलं.

संतापजनक! हॉकी टीम पराभूत झाल्यानंतर खेळाडूच्या घराजवळ फोडले फटाके, पाहा VIDEO

या धक्क्यातून इंग्लंड सावरण्यापूर्वी शार्दूल ठाकूरनं एक बाजू लावून खेळणाऱ्या जो रूटला (Joe Root) आऊट करत इंग्लंडला सर्वात मोठा धक्का दिला. रुटनं 64 रन केले. जो रुट आऊट होताच इंग्लंड मोठा स्कोअर करणार नाही हे स्पष्ट झाले होते. सॅम करननं शेवटी झुंज दिल्यानं इंग्लंडला 183 रन करता आले.

First published:

Tags: Cricket, India vs england