मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: टीम इंडियाला कोरोना लाटेतील निष्काळजीपणा भोवला, खेळाडूंचं आरोग्य धोक्यात

IND vs ENG: टीम इंडियाला कोरोना लाटेतील निष्काळजीपणा भोवला, खेळाडूंचं आरोग्य धोक्यात

टीम इंडियाची (Team India) सुट्टी सुरु झाली तेव्हा ब्रिटनमध्ये करोनाचा (coronavirus) धोका वाढला होता. क्रिकेटपटूंच्या निष्काळजीपणामुळेच टीम इंडियात कोरोनाीचा शिरकाव झाला का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 15 जुलै: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टेस्ट सीरिज सुरू होण्यापूर्वी एक काळजीची बातमी इंग्लंडमधून आली आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. याबात माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार भारतीय टीममधील दोन खेळाडूंना पहिल्या टेस्टमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी एकाचा दुसरा रिपोर्ट हा निगेटीव्ह आला आहे. भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या निष्काळजीपणामुळेच टीम इंडियात कोरोनाीचा शिरकाव झाला का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भारतीय खेळाडूंना भटकंती भोवली? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल संपल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना 20 दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. टीम इंडियाची  सुट्टी सुरु झाली तेव्हा ब्रिटनमध्ये करोनाचा धोका वाढला होता. रोजच्या पेशंट्सची संख्या सातत्याने वाढत होती. तरीही भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंची लंडन आणि जवळपासच्या परिसरात भटकंती सुरू होती. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे लंडनच्या गर्दीमध्ये फिरताना दिसले होते. इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना टीम इंडियाचे खेळाडू मात्र बिनधास्त मास्कचा वापर न करता भटकंती करत आहेत. भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह त्याची पत्नी संजना गणेशनसोबत युरो कप सेमी फायनल बघण्यासाठी गेला होता. ऋषभ पंतनंही त्याच्या मित्रासोबत युरो कपची मॅच पाहिली होती. इशांत शर्मा आणि मयंक अग्रवाल त्यांच्या पत्नीसोबत सॅलिसबेरीमधलं स्टोनहेंज बघायला गेले होते. तर कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विम्बलडन सामन्यांचा आनंद घेतला. WI vs AUS : आक्रमक रसेल गेला फेल, थरारक लढतीत ऑस्ट्रेलियाचा विजय इंग्लंडच्या अनुभवानंतरही जाग नाही? इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा-3 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. इंग्लंड टीममधल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाली, ज्यामुळे इंग्लंडला पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठी संपूर्ण टीमच बदलावी लागली. पाकिस्तानची सीरिज सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच हा प्रकार घडला होता. त्यामुळे टीम इंडियाने अधिक खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र तरीही भारतीय खेळाडूंनी गर्दीच्या ठिकाणी बिनधास्त मास्कचा वापर न करता फिरत होते. टीमची चिंता वाढली टीम इंडियाचे खेळाडू आता डरहॅममध्ये दाखल झाले आहेत. याच ठिकाणी 20 ते 22 जुलै दरम्यान एक सराव सामना खेळला जाणार आहे. पहिल्या टेस्टच्या सरावासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. हा सामना सुरु होण्यााच्या काही दिवस आधीच एकाला कोरोनाची लागण झाल्यानं भारतीय मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं आहे.
First published:

Tags: Coronavirus, India vs england, Team india

पुढील बातम्या