Home /News /sport /

IND vs AUS : 'या दोन खेळाडूंचं भारताला आव्हान, सीरिज सोपी नाही', झहीरची चिंता

IND vs AUS : 'या दोन खेळाडूंचं भारताला आव्हान, सीरिज सोपी नाही', झहीरची चिंता

टीम इंडिया (Team India) ला ऑस्ट्रेलियाचा दौरा सोपा जाणार नाही, असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान (Zaheer Khan) ने व्यक्त केलं आहे.

    मुंबई : टीम इंडिया (Team India) ला ऑस्ट्रेलियाचा दौरा सोपा जाणार नाही, असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान (Zaheer Khan) ने व्यक्त केलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या सीरिजचा निर्णय बॉलरच्या कामगिरीवर होईल, कारण दोन्ही टीममध्ये जगातले सर्वोत्कृष्ट बॉलर असल्याची प्रतिक्रिया झहीरने दिली. भारताकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी तर ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे जगातले दिग्गज फास्ट बॉलर आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. 27 नोव्हेंबरला या दौऱ्याची पहिली वनडे मॅच खेळवली जाईल. 'ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर नेहमीच चांगली उसळी आणि वेग असतो. त्यामुळे बॉलरच वनडे, टी-20 आणि टेस्ट सीरिजचा निकाल ठरवतील. जगातल्या सर्वोत्तम बॉलरचा विचार केला, तर यातले सगळे बॉलर या सीरिजमध्ये खेळणार आहेत,' असं झहीर म्हणाला. डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांच्या उपस्थितीमुळे भारतापुढे खडतर आव्हान असल्याचं वक्तव्यही झहीर खानने केलं. मागच्या दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला होता. त्यावेळी स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये नव्हते. बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी या दोन्ही खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 'स्मित आणि वॉर्नर यांचं ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये पुनरागमन झालं आहे. त्यामुळे मागच्या दौऱ्यापेक्षा भारतापुढे या दौऱ्यात मोठं आव्हान असेल. या दौऱ्यात कोणतीही टीम प्रबळ दावेदार नाही, कारण दोन्ही टीमची बॉलिंग आणि बॅटिंग उत्कृष्ट आहे,' असं झहीर या सीरिजची अधिकृत प्रसारण करणाऱ्या सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या