IND vs AUS : पंत का साहा, कोणाला मिळणार संधी? गांगुलीने दिलं उत्तर

IND vs AUS : पंत का साहा, कोणाला मिळणार संधी? गांगुलीने दिलं उत्तर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया (India vs Australia) कडे ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) हे दोन पर्याय आहेत. या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार, याबाबत बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. वनडे आणि टी-20 मध्ये भारतीय टीम विकेट कीपर म्हणून केएल राहुल (KL Rahul) मैदानात उतरेल, तर टेस्टसाठी टीमकडे ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) हे दोन पर्याय आहेत. या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार, याबाबत बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भाष्य केलं आहे. साहा आणि पंत हे दोघंही सर्वोत्तम विकेट कीपर बॅट्समन आहेत, पण जो फॉर्ममध्ये आहे, त्यालाच संधी मिळाली पाहिजे, असं गांगुली पीटीआयशी बोलताना म्हणाला आहे.

सौरव गांगुली (Sourav Ganguly) चं हे वक्तव्य बघितलं, तर टेस्ट टीममध्ये ऋद्धीमान साहाला संधी मिळेल. साहाने आयपीएल (IPL 2020) मध्ये चांगली कामगिरी केली होती, तर ऋषभ पंतला संपूर्ण मोसमात संघर्ष करावा लागला होता. पंतने 14 मॅचमध्ये 31.18 च्या सरासरीने आणि 113.95 च्या स्ट्राईक रेटने 343 रन केले. तर साहाला दुखापतीमुळे फक्त 4 मॅच खेळता आल्या. सहाने आयपीएलच्या मोसमात 71.33 च्या सरासरीने आणि 140 च्या स्ट्राईक रेटने 214 रन केले. एवढच नाही तर विकेट कीपर म्हणून ऋद्धीमान साहा पंतच्या पुढे आहे.

पंतचं ऑस्ट्रेलियात धमाकेदार रेकॉर्ड

मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऋषभ पंतने धमाकेदार कामगिरी केली होती. 4 टेस्ट मॅचमध्ये त्याने 58.33 च्या सरासरीने 350 रन केले होते. यामध्ये एका शतकाचाही समावेश होता. त्यामुळे टीम इंडिया पंतचं मागचं रेकॉर्डवर का साहाच्या सातत्यावर विश्वास ठेवतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Published by: Shreyas
First published: November 25, 2020, 7:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading