IND vs AUS : भारताच्या पराभवाचं भाकीत करणाऱ्या खेळाडूला वसीम जाफरचं सडेतोड प्रत्युत्तर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा (India vs Australia) विजय झाला आहे. या विजयानंतर वसीम जाफर (Wasim Jaffer) याने मायकल वॉन (Michael Vaughan) वर निशाणा साधला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा (India vs Australia) विजय झाला आहे. या विजयानंतर वसीम जाफर (Wasim Jaffer) याने मायकल वॉन (Michael Vaughan) वर निशाणा साधला आहे.

  • Share this:
    सिडनी, 6 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारताने टी-20 सीरिजमध्ये घेतला आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव करत टी-20 सीरिज खिशात टाकली. पहिल्या टी-20 मध्ये भारताचा 11 रनने विजय झाला होता. भारताचा टी-20 मधला हा लागोपाठ 10 वा विजय आहे. टी-20 मध्ये पहिल्यांदाच भारत लागोपाठ एवढे सामने जिंकला आहे. टी-20 सीरिजआधी भारताला वनडे सीरिजमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रनने तर दुसऱ्या वनडेमध्ये 51 रनने भारताचा पराभव झाला होता. सीरिज गमावल्यानंतर तिसरी वनडे भारताने तिसरी वनडे मात्र 11 रनने जिंकली होती. पहिल्या वनडे मॅचमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन (Michael Vaughan) याने या दौऱ्यात भारताचा मोठा पराभव होईल, असं भाकीत केलं होतं. आता टी-20 सीरिज भारताने जिंकल्यानंतर वसीम जाफर (Wasim Jaffer) याने मायकल वॉनला ट्विटरवरच प्रत्युत्तर दिलं आहे. गॅन्ग्स ऑफ वासेपूरच्या एका सीनचा फोटो शेयर करत जाफरने मायकल वॉनवर निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपासून वसीम जाफर त्याच्या भन्नाट ट्विटमुळे कायमच चर्चेत येत आहे. मायकल वॉनला प्रत्युत्तर देण्याआधी आजही त्याने पाकिस्तानचा क्रिकेटपटू सरफराज अहमदला त्याच्या इंग्रजीवरुन ट्रोल केलं. बीसीसीआयने रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर याच्या वाढदिवसानिमित्त ट्विट केलं होतं, या ट्विटवर जाफरने सरफराज अहमदचा फोटो असलेलं एक मीम शेयर केलं. मैदानात नेहमीच शांत राहिलेल्या वसीम जाफरचा आता सोशल मीडियावर धुमाकूळ
    Published by:Shreyas
    First published: