मुंबई, 22 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला. यानंतर आता सीरिजची दुसरी टेस्ट 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतील, अशी शक्यता आहे. विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतल्यामुळे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कडे उरलेल्या तीन टेस्ट मॅचमध्ये टीमचं नेतृत्व असेल.
भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने अजिंक्य रहाणेला कोड्यातून टीम इंडियाच्या निवडीबाबत सल्ला दिला आहे. वसीम जाफर सध्या सोशल मीडियावर बराच सक्रीय आहे. हटके ट्विट्स आणि मीम्समुळे जाफर चर्चेत असतो, यावेळीही त्याने अजिंक्यला टीममध्ये कोणत्या खेळाडूला संधी द्यावी याबाबत सांगितलं आह.
अजिंक्यने दुसऱ्या टेस्टमध्ये शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना संधी द्यावी, असं रहाणे म्हणाला आहे. 'प्रिय अजिंक्य रहाणे तुझ्यासाठी एक गुप्त संदेश आहे. बॉक्सिंग डे टेस्टसाठी शुभेच्छा.' असं ट्विट जाफरने केलं. याचसोबत त्याने चाहत्यांनाही तुम्ही हे कोडं सोडवू शकता, असं सांगितलं.
वसीम जाफरच्या या कोड्याचं उत्तर गिल आणि राहुलला टीममध्ये घे, असं आहे. जाफरने ट्विट केलेल्या प्रत्येक ओळीतला पहिला शब्द बघितला तर तो PICK GILL AND RAHUL म्हणजेच गिल आणि राहुलला टीममध्ये घे असा होतो.
Dear @ajinkyarahane88, here's a (hidden) message for you. Good luck for Boxing Day!
People
In
Cricket
Know
Grief
In
Life
Lingers
Aplenty
Never
Dabble
Rise
And
Handcraft
Unique
Legacy
PS: you guys are open to have a go and decode the msg too #INDvsAUS #AUSvIND
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 21, 2020
मेलबर्न टेस्टमध्ये बदल
मेलबर्न टेस्टमधून विराट कोहली आणि मोहम्मद शमी आधीच बाहेर आहेत. याशिवाय पृथ्वी शॉला देखील डच्चू मिळू शकतो. तसंच ऋद्धीमान साहा आणि हनुमा विहारीच्या समावेशाबाबतही टीम प्रशासन कठोर निर्णय घेऊ शकते. त्यामुळे पृथ्वी शॉच्या जागी केएल राहुल, विराटच्याऐवजी शुभमन गिल, ऋद्धीमान साहा ऐवजी ऋषभ पंत, हनुमा विहारीऐवजी रविंद्र जडेजा यांना संधी मिळू शकते. तर मोहम्मद शमीला दुखापत झाल्यामुळे मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि टी नटराजन यांच्यापैकी एक मैदानात उतरू शकतो.