मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : पुढच्या सामन्यात हा असणार सहावा बॉलर, विराटने दिले संकेत

IND vs AUS : पुढच्या सामन्यात हा असणार सहावा बॉलर, विराटने दिले संकेत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया (Team India) ची सुरुवात खराब झाली. वनडे सीरिजच्या पहिल्याच मॅचमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाला सहाव्या बॉलरची कमी जाणवली. त्यामुळे पुढच्या मॅचच्या रणनीतीवर विराट (Virat Kohli) ने भाष्य केलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

सिडनी, 27 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया (Team India) ची सुरुवात खराब झाली. वनडे सीरिजच्या पहिल्याच मॅचमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाला सहाव्या बॉलरची कमी जाणवली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात झालेल्या पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 374 रन केले. कर्णधार एरॉन फिंच याने 114, स्टीव्ह स्मिथने 105, वॉर्नरने 69 आणि मॅक्सवेलने 45 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या भारताला 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 308 रन करता आले. हार्दिक पांड्याने 90 आणि शिखर धवनने 74 रनची खेळी केली, पण इतर कोणत्याही बॅट्समनला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

भारतीय बॉलरना वेळेत विकेट मिळाली नाही आणि सहावा बॉलर नसणं हे टीम इंडियाच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. विराट कोहलीलाही मॅच संपल्यानंतर याबाबत प्रश्न विचारण्यात आला. भारतीय टीममध्ये सहावा बॉलर नसल्यामुळे तू बॉलिंग करशील का? असं विराटला विचारलं असता त्याने हसत हो म्हणून उत्तर दिलं. पुढच्या मॅचमध्ये मी एरॉन फिंचला काही ओव्हर बॉलिंग करेन, असं हसत विराट म्हणाला.

एरॉन फिंचने केलं शतक, पण ट्रोल झाला विराट!

27-28 ओव्हरपर्यंत भारताचं मॅचवर नियंत्रण होतं, पण यानंतर स्मिथ आणि फिंच यांनी उत्कृष्ट बॅटिंग करून ऑस्ट्रेलियाला मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवलं आणि आमच्या बॉलरनाही योग्य वेळी विकेट मिळाल्या नाहीत, हे विराटने मान्य केलं.

First published: