मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : सिडनीमध्ये विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच

IND vs AUS : सिडनीमध्ये विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच

ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सगळ्यांचं लक्ष विराट कोहली (Virat Kohli) कडे लागलं होतं, पण विराटने या सगळ्यांना निराश केलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

सिडनी, 28 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सगळ्यांचं लक्ष विराट कोहली (Virat Kohli) कडे लागलं होतं, पण विराटने या सगळ्यांना निराश केलं. 21 रनची खेळी करून विराट आऊट झाला. या छोट्या इनिंगमध्ये विराटचा एक कॅचही सुटला. सिडनीच्या मैदानात विराट कोहलीची निराशाजनक कामगिरी अजून सुरूच आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीची तुलना सचिन तेंडुलकरशी केली जाते. सिडनी हे सचिनचं आवडतं मैदान होतं. सचिनने ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक 4 शतकं (टेस्ट आणि वनडे) याच मैदानात केली होती. पण विराटला मात्र या मैदानात संघर्ष करावा लागत आहे. वनडेच्या 6 इनिंगमध्ये विराटने 57 रन केले आहेत. सिडनीच्या मैदानात विराटची सरासरी फक्त 11.4 आहे. सिडनीमधला विराटचा सर्वाधिक स्कोअर 21 रन आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी वनडे सिडनीमध्येच होणार आहे. या मॅचमध्ये विराट चांगली कामगिरी करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.

विराटचं आवडतं मैदान

ऑस्ट्रेलियामध्ये ऍडलेड विराटचं आवडतं मैदान आहे. विराटने ऍडलेडमध्ये 76 पेक्षा जास्तच्या सरासरीने रन केले आहेत. टेस्ट आणि वनडे मिळून विराटने ऍडलेडमध्ये 11 इनिंग खेळल्या, यामध्ये त्याने 765 रन केले. ऍडलेडमध्ये विराटने 5 शतकं केली आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली डे-नाईट टेस्ट याच मैदानात होणार आहे. या मैदानात विराटने नेहमीच रनचा डोंगर उभारला आहे. सगळ्यात आधी 2008 साली विराटने या मैदानात 116 रनची खेळी केली होती. 2014 साली विराटने या मैदानात दोन इनिंगमध्ये दोन शतकं केली होती. विराटने ऍडलेडमध्ये लागोपाठ तीन इनिंगमध्ये तीन शतकं केली आहेत. याशिवाय मागच्यावर्षीही विराटने या मैदानात 104 रन केले होते.

विराटचं ऑस्ट्रेलियातलं रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियामध्ये विराटने 54 पेक्षा जास्तच्या सरासरीने (टेस्ट, वनडे आणि टी-20) रन केले आहेत. ऐतिहासिक मेलबर्नमध्ये विराटने 50 पेक्षा जास्तच्या सरासरीने रन केले. मेलबर्नमध्येही विराटने दोन शतकं केली, तर होबार्टमध्ये त्याच्या नावावर एक शतक आहे. पर्थमध्ये विराटने 3 अर्धशतकं केली आहेत.

First published: