Home /News /sport /

IND vs AUS : जसप्रीत बुमराहला राग अनावर, मैदानात पाहा केलं

IND vs AUS : जसप्रीत बुमराहला राग अनावर, मैदानात पाहा केलं

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्या (India vs Australia) मधली वनडे सीरिज गमावली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाला बॉलरकडून प्रामुख्याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कडून खूप अपेक्षा होत्या.

    सिडनी, 1 डिसेंबर : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्या (India vs Australia) मधली वनडे सीरिज गमावली आहे. सीरिजच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा मोठा पराभव झाला. दोन्ही मॅचमध्ये पराभवाचं मुख्य कारण खराब बॉलिंग राहिलं. पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने 374 रन केले, तर दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी 389 रनपर्यंत मजल मारली. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या पाचही बॅट्समननी अर्धशतकापेक्षा जास्तची खेळी केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाला बॉलरकडून प्रामुख्याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कडून खूप अपेक्षा होत्या. आयपीएल (IPL 2020)मध्ये धमाकेदार कामगिरी करून बुमराह ऑस्ट्रेलियाला पोहोचला होता, पण त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. बुमराहवर आता खराब कामगिरीचा दबाव दिसत आहे, कारण मैदानात नेहमीच शांत असणारा बुमराह संतापलेला पाहायला मिळाला. बुमराहचं हे रूप चाहत्यांना पहिल्यांदाच बघायला मिळालं. जसप्रीत बुमराह याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बुमराह मैदानात 30 यार्डावर फिल्डिंग करत असताना त्याने फिल्डिंग मार्करला लाथ मारली आहे. बुमराहने संतापून फिल्डिंग मार्करला लाथ मारल्याचं सांगितलं जात आहे. बुमराहने वनडे सीरिजच्या 2 मॅचमध्ये 2 विकेट घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेट 7.60 होता. बुमराहने या सीरिजच्या 20 ओव्हरमध्ये 152 रन दिले. लाईन आणि लेन्थ खराब राहिल्यामुळेही त्याच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समननी आक्रमण केलं. मागच्या काही आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये बुमराहची कामगिरी खराब राहिली. 6 मॅचमध्ये त्याला फक्त 2 विकेटच घेता आल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये तीन मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण आयपीएलमध्ये मात्र त्याने तब्बल 27 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर होता. ऑस्ट्रेलियामध्ये मात्र बुमराहच्या खराब बॉलिंगचा फटका टीम इंडियाला बसत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या