मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराट कोहलीचे टेन्शन संपले! ‘हा’ बॉलर घेणार इशांत शर्माची जागा

विराट कोहलीचे टेन्शन संपले! ‘हा’ बॉलर घेणार इशांत शर्माची जागा

भारत वि. ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील ॲडलेड (Adelaide) मध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचचे वेध सर्वांना लागले आहेत. या टेस्टमध्ये इशांत शर्मा (Ishant Sharma) ची जागा कोण घेणार याची काळजी दूर झाली आहे.

  • Published by:  News18 Desk
सिडनी, 7 डिसेंबर:  भारत वि. ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी 20 सीरिज संपण्यापूर्वीच ॲडलेड (Adelaide) मध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचचे वेध सर्वांना लागले आहेत. या टेस्टमध्ये इशांत शर्मा (Ishant Sharma) ची जागा कोण घेणार याची काळजी विराट कोहलली (Virat Kohli) ला होती. विराटचे हे टेन्शन आता दूर झाले आहे. उमेश यादवने (Umesh Yadav) ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरु असलेल्या सराव सामन्यात चांगली कामगिरी करत भारतीय टीममधील तिसऱ्या फास्ट बॉलरच्या जागेसाठी दावेदारी बळकट केली आहे. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा हे भारताचे टेस्ट क्रिकेटमधील फास्ट बॉलरचे त्रिकूट आहे. या त्रिकुटाने भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. यापैकी इशांत शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेला नाही. सिडनीमध्ये सुरु असलेल्या सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उमेश यादवने तीन विकेट्स घेतल्या. उमेशच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया अ ने दिवसअखेर 8 आऊट 268 रन्स काढले आहेत. उमेशनं सुरुवातीचा स्पेल खतरनाक टाकला. त्याने ऑस्ट्रेलिया अ च्या दोन्ही सलामीविरांना आऊट केले.  विल पुकोवस्की आणि जो बर्न या सलामीवीरांना त्याने स्थिरावण्याची संधी दिली नाही. त्यानंतर त्याने टीम पेनला आऊट करत तिसरी विकेट घेतली. विशेष म्हणजे उमेशने आऊट केलेल्या तिन्ही फलंदाज भारताविरुद्ध निवड झालेल्या ऑस्ट्रेलियन टेस्ट टिमचे सदस्य आहेत. उमेशने 18 ओव्हर्समध्ये 44 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या. यापूर्वी भारत ‘अ’ ने पहिला डाव 9 आऊट 247 रनवर घोषित केला होता. कॅप्टन अजिंक्य रहाणेने सर्वात जास्त 117 रन काढले. रहाणे शेवटपर्यंत नाबाद होता. उमेशसाठी आयपीएल स्पर्धा निराशाजनक ठरली होती. सुरुवातीच्या खराब कामगिरीनंतर त्याला संपूर्ण स्पर्धेत बेंचवर बसावं लागलं होतं. आयपीएलमधील अपयश झटकून देत उमेशनं फॉर्मात परतल्याचे संकेत दिले आहेत. टीम इंडियाच्या फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या