पत्रकार परिषदेमध्येच आला रिपोर्टरला फोन, टिम पेनने दिली भन्नाट प्रतिक्रिया

पत्रकार परिषदेमध्येच आला रिपोर्टरला फोन, टिम पेनने दिली भन्नाट प्रतिक्रिया

टिमचं हे संभाषण तिथे उपस्थित सगळेच कान देऊन ऐकत होते. टिमने फोन ठेवल्यावर हॉलमध्ये हास्याची लाट उसळली.

  • Share this:

सिडनी, ०५ जानेवारी २०१९- ऑस्ट्रेलिया भलेही सध्या धावांचा पाठलाग करत असली तरी दुसऱ्या दिवसाच्या पत्रकार परिषदमध्ये  ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने तो लोकांना हसवायला विसरला नाही हे दाखवून दिलं. सिडनी कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिला डाव ६२२- ७ घोषित केला. सध्या ऑस्ट्रेलियासमोर मालिका हरण्याचं मोठं संकट आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाच्या पत्रकार परिषदेत टिम पेनला प्रश्न विचारले जात असताना अचानक असे काही घडले की क्षणाधार्त उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

त्याचे झाले असे की पत्रकार टिमला प्रश्न विचारत असताना अचानक एका रिपोर्टरचा फोन वाजला. टीमने फोन उचलला आणि तो फोनवर बोलायला लागला. ‘हॅलो, टिम पेन बोलत आहे? कोण बोलतंय? पुन्हा सांगू शकता का कोण बोलतंय? अच्छा हाँगकाँगवरुन ‘कॅसी’ बोलत आहे. मार्टिन ठिक आहे. सध्या तो एका पत्रकार परिषदेत आहे. त्याला मी तुम्हाला नंतर फोन करायला सांगू का? ठिक आहे. मी त्याला ई-मेल पाहायला सांगतो. धन्यवाद कैसी.’ टिमचं हे संभाषण तिथे उपस्थित सगळेच कान देऊन ऐकत होते. टिमने फोन ठेवल्यावर हॉलमध्ये हास्याची लाट उसळली.
स्टीवन स्मिथ, डेविड वॉर्नरवर बंदी घातल्यानंतर टिम पेनकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली. आतापर्यंत अनेकांनी कर्णधार म्हणून पेनचं कौतुक केलं आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सारं काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे.

सिडनी कसोटीसाठी भारताने पहिल्या दिवशी ३०३- ४ एवढा स्कोअर केला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज आणि पेनमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली. गोलंदाजीचे प्रशिक्षक डेविड सेकर यांनी सांगितलं की, ‘मला वाटतं की गोलंदाजांना काही वेगळं हवं होतं आणि पेनची दुसरी अपेक्षा होती. यामुळेच दोघांमध्ये विसंवाद झाला, याचा फायदा भारताला झाला.’


VIDEO : राज ठाकरे मोदींना टाळून राहुल गांधींना देणार का मुलाच्या लग्नाची पत्रिका?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2019 09:30 AM IST

ताज्या बातम्या