मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं सांगितलं दबावात खेळण्याचं रहस्य, म्हणाला...

Ind vs Aus : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं सांगितलं दबावात खेळण्याचं रहस्य, म्हणाला...

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं भारताविरूद्धच्या मॅचमध्ये दबावात खेळण्याचे रहस्य सांगितले आहे.

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं भारताविरूद्धच्या मॅचमध्ये दबावात खेळण्याचे रहस्य सांगितले आहे.

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं भारताविरूद्धच्या मॅचमध्ये दबावात खेळण्याचे रहस्य सांगितले आहे.

मुंबई, 23 सप्टेंबर :  आयपीएल स्पर्धेतील अनुभवामुळे पहिल्या T20I मध्ये दबावाखालीही शांत राहण्यास मदत झाली, असा खुलासा सिंगापूरमध्ये जन्मलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू टीम डेव्हिडने केला. डेव्हिडने मंगळवारी मोहालीमध्ये भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या T20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केलं. भारतीय वातावरण आणि परिस्थितीशी परिचित असल्याने आणि आयपीएलमध्ये बऱ्याच भारतीय खेळाडूंविरुद्ध खेळल्यामुळे, डेव्हिडला फारसं दडपण जाणवलं नाही. त्यामुळे त्याने विकेटकीपर मॅथ्यू वेडसह खेळून ऑस्ट्रेलियाला मोहालीच्या बिंद्रा स्टेडियमवर भारताविरुद्ध चार विकेटने विजय मिळवून दिला. डेव्हिडने 14 बॉलमध्ये 18 धावा केल्या, ज्यामधे एक फोर आणि एका सिक्सरचा समावेश होता. दुसरीकडे वेडने 21 बॉलमध्ये 45 रन्स काढले.डेव्हिड आणि वेडने मिळून सहाव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. जगभरातील फ्रँचायझी क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतर डेव्हिडला 2021च्या IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने  संघात सामील करून घेतलं. नंतर झालेल्या लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने 8.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मात्र, सुरुवातीला डेव्हिड चांगलं खेळू शकला नाही, त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलं नव्हतं. कालांतराने आयपीएलच्या उत्तरार्धात त्याला मैदानात खेळण्याची पुन्हा संधी मिळाली आणि त्याने टीमला काही मॅचेस जिंकून देण्यास खूप मदत केली होती. भारतीय टीममधील खेळाडूंबरोबर आणि विरुद्ध भारतात खेळण्याचा अनुभव डेव्हिडला चांगलाच कामी आला. यामुळेच तो मैदानात अगदी शांत दिसत होता आणि त्याने ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकून देण्यास वेडला मदत केली. टीम डेव्हिड म्हणाला, 'मला याआधी भारतात खेळण्याचा अनुभव नक्कीच आहे आणि मी अलीकडे खूप टी-20 क्रिकेट खेळलो आहे. मॅच खेळताना मला शांत वाटलं कारण मला माहीत होतं, की आम्ही त्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगल्या स्थितीत होतो.’ IPL 2023 : पुढच्या वर्षी बदलणार आयपीएलचा फॉरमॅट, गांगुलीने केलं कन्फर्म पुढे तो म्हणाला, शिवाय त्या दिवशी पिचची खूप मदत झाली. वेड बिग बॅश लीगमधील हरिकेन्स संघाचा भाग आहे, त्यामुळे वेडला दुसऱ्या बाजूला असल्यानंही मदत झाली.’ असं डेव्हिडनं सांगितलं. ऑस्ट्रेलियन टीममधील आपल्या भूमिकेबाबत तो म्हणाला, 'माझं काम मधल्या फळीत बॅटिंग करणं आहे, म्हणजेच मी जास्त बॉलचा सामना करणार नाही. माझी जबाबदारी फिनिशरची आहे आणि मी त्या पद्धतीनं खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची दुसरी मॅच आज (23 सप्टेंबर 22) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरच्या जामठा स्टेडियमवर होणार आहे. तीन मॅचेसच्या सीरिजमध्ये सध्या ऑस्ट्रेलियाने एक मॅच जिंकली आहे, त्यामुळे आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला आजची मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे. आजची मॅच जिंकणं फार महत्त्वाचं आहे.
First published:

Tags: Cricket news, India vs Australia, Mumbai Indians

पुढील बातम्या