IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्याची संधी, अशी असणार टीम इंडिया!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्याची संधी, अशी असणार टीम इंडिया!

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्यासाठी मैदानात उतरेल

  • Share this:

सिडनी, 8 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली तिसरी आणि अखेरची टी-20 मॅच थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या मॅचमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्याची संधी टीम इंडियाला आहे. याआधी पहिल्या मॅचमध्ये भारताचा 11 रनने आणि दुसऱ्या मॅचमध्ये 6 विकेटने विजय झाला होता. या दौऱ्यात हार्दिक पांड्या फिनिशरची भूमिका बजावत आहे, तर टी. नटराजनच्या रुपात भारताला आणखी एक घातक फास्ट बॉलर मिळाला आहे.

दुसऱ्या टी-20 मध्ये बाकीच्या बॉलरनी खोऱ्याने रन दिल्या असताना नटराजन याने 4 ओव्हरमध्ये फक्त 20 रन देऊन 2 विकेट घेतल्या. पण युझवेंद्र चहलचा फॉर्म विराटसाठी चिंतेचा विषय आहेयय पहिल्या टी-20 मध्ये चहलने 3 विकेट घेतल्या असल्या तरी वनडे सीरिज आणि दुसऱ्या टी-20 मध्ये त्याची कामगिरी निराशाजनक राहिला.

दुसऱ्या टी-20 मध्ये मनिष पांडेच्या कोपराला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आलं होतं. आता मनिष पांडे फिट झाला तर त्याच्याऐवजी श्रेयस अय्यर किंवा संजू सॅमसन याला बाहेर बसावं लागू शकतं. पहिल्या मॅचमध्ये पांडेने 2 रन केले होते, तर संजू सॅमसनने दोन मॅचमध्ये 23 आणि 15 रनची खेळी केली होती. अय्यरने दुसऱ्या टी-20मध्ये नाबाद 12 रन केले होते.

भारताची संभाव्य टीम

केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, संजू सॅमसन, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, टी. नटराजन

Published by: Shreyas
First published: December 8, 2020, 12:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या