Home /News /sport /

IND vs AUS : टीम इंडियाचा अखेर विजय, पण सीरिज गमावली

IND vs AUS : टीम इंडियाचा अखेर विजय, पण सीरिज गमावली

टीम इंडियाला अखेर वनडेमध्ये विजय मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेमध्ये भारताचा 13 रननी विजय झाला आहे. या मॅचमध्ये भारताचा विजय झाला असला तरी सीरिज मात्र भारताने 2-1 ने गमावली आहे.

पुढे वाचा ...

  कॅनबेरा, 2 नोव्हेंबर :  टीम इंडियाला अखेर वनडेमध्ये विजय मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेमध्ये भारताचा 13 रननी विजय झाला आहे. या मॅचमध्ये भारताचा विजय झाला असला तरी सीरिज मात्र भारताने 2-1 ने गमावली आहे. यावर्षी न्यूझीलंड दौऱ्यात भारताने तिन्ही वनडे गमावल्या होत्या, यानंतर ऑस्ट्रेलियातही भारताचा पहिल्या दोन मॅचमध्ये पराभव झाला. लागोपाठ 5 वनडे गमावल्यानंतर आता भारताला विजय मिळाला आहे.

  भारताने ठेवलेल्या 303 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा 49.3 ओव्हरमध्ये 289 रनवर ऑलआऊट झाला. एरॉन फिंचने 82 बॉलमध्ये सर्वाधिक 75 रन केले, तर ग्लेन मॅक्सवेलने 38 बॉलमध्ये 59 रनची आक्रमक खेळी केली. विकेट कीपर ऍलेक्स कॅरी 38 रन करून आऊट झाला, तर आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या कॅमरून ग्रीनला 21 रन करता आले. भारताकडून शार्दुल ठाकूरला 3, नटराजनला आणि बुमराहला 2 , कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

  त्याआधी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या फटकेबाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला 303 रनचं आव्हान दिलं. हार्दिक पांड्याने 76 बॉलमध्ये नाबाद 92 रन तर रवींद्र जडेजाने 50 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले. भारताने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण ऑस्ट्रेलियाच्या बॉलरनी वारंवार धक्के दिले. विराट कोहलीने 63 रनची खेळी केली, तर शुभमन गिल 33 रनवर माघारी गेला. श्रेयस अय्यरला 19 रन आणि केएल राहुलला 5 रन करता आले. ऑस्ट्रेलियाकडून ऍश्टन एगरने 2 तर हेजलवूड, एबॉट आणि झम्प यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

  या मॅचमध्ये टीम इंडियामध्ये चार बदल करण्यात आले आहेत. मयंक अग्रवालऐवजी शुभमन गिल, युझवेंद्र चहलऐवजी कुलदीप यादव, मोहम्मद शमीऐवजी टी नटराजन आणि नवदीप सैनीऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियानेही टीममध्ये तीन बदल केले आहेत. कॅमरुन ग्रीन, सीन ऍबॉट आणि एश्टन एगर यांना संधी देण्यात आली आहे. मागच्या मॅचमध्ये डेव्हिड वॉर्नरला दुखापत झाल्यामुळे तो खेळणार नाही, तर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांना विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रनने तर दुसऱ्या वनडेमध्ये 51 रनने पराभव झाला होता. खराब बॉलिंगचा फटका टीम इंडियाला मोठ्या प्रमाणात बसला होता. भारतीय टीम शिखर धवन, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, टी नटराजन ऑस्ट्रेलियाची टीम एरॉन फिंच, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॉइसेस हेनरिक्स, ऍलेक्स कारे, कॅमरुन ग्रीन, एश्टन एगर, सीन ऍबॉट, एडम झम्पा, जॉस हेजलवूड

  Published by:Shreyas
  First published:

  पुढील बातम्या