IND vs AUS : दुसऱ्या टेस्टपासून रहाणे कर्णधार, सचिन तेंडुलकर म्हणतो...

IND vs AUS : दुसऱ्या टेस्टपासून रहाणे कर्णधार, सचिन तेंडुलकर म्हणतो...

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिज (Border-Gavaskar Trophy) ला सुरुवात झाली आहे. पहिली मॅच संपल्यानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. त्यामुळे उरलेल्या तीन मॅचमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताचं नेतृत्व करणार आहे. रहाणेच्या नेतृत्वावर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिज (Border-Gavaskar Trophy) ला सुरुवात झाली आहे. दोन्ही टीममध्ये पहिला सामना डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येत आहे. ही मॅच संपल्यानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट भारतात परतणार आहे. त्यामुळे उरलेल्या तीन मॅचमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताचं नेतृत्व करणार आहे. रहाणेच्या नेतृत्वावर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने प्रतिक्रिया दिली आहे.

अजिंक्य रहाणे समदार कर्णधार आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टेस्ट मॅचमध्ये तो संतुलित आक्रमकता दाखवून चांगलं नेतृत्व करेल, असा विश्वास सचिन तेंडुलकरने व्यक्त केला आहे.

अजिंक्य रहाणेने धर्मशालामध्ये झालेल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचं नेतृत्व केलं होतं. सचिनने तेव्हा रहाणेला कर्णधारपद भुषवताना बघितलं होतं, त्यामुळे यावेळीही रहाणे तशीच कामगिरी करेल, अशी अपेक्षा सचिनला आहे. सचिन तेंडुलकर स्पोर्ट्स टुडेशी बोलत होता.

'मी अजिंक्य रहाणेला ओळखतो, तो खूप समजदार आणि संतुलित आहे. रहाणे आक्रमक असला, तरी त्याची आक्रमकता नियंत्रित आहे. मी रहाणेसोबत जेवढा वेळ घालवला, ते पाहून सांगू शकतो की तो खूप मेहनती आहे,' अशी प्रतिक्रिया सचिनने दिली.

'रहाणे कोणतीही गोष्ट हलक्यात घेत नाही. जर तुम्ही मेहनत कराल आणि इमानदार असाल, तर निकाल आपोआप मिळतो. या सीरिजसाठी टीमने चांगली तयारी केली असेल. टीमने निकालावर लक्ष देऊ नये, तर प्रक्रियेवर लक्ष द्यावं, यामुळे निकाल आपोआप तुमच्या बाजूने लागेल,' असा विश्वास सचिनने वर्तवला आहे.

Published by: Shreyas
First published: December 17, 2020, 2:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या