मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : टेस्ट सीरिजमध्ये विराट नसताना या खेळाडूला संधी!

IND vs AUS : टेस्ट सीरिजमध्ये विराट नसताना या खेळाडूला संधी!

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 7 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा विजय झाला आहे. पहिल्या मॅचमध्ये भारताने 11 रनने तर दुसऱ्या टी-20मध्ये 6 विकेटने जिंकत भारताने सीरिजमध्ये 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरी टी-20 मॅच 8 डिसेंबरला होणार आहे. टी-20 सीरिज संपल्यानंतर दोन्ही टीममध्ये चार टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. 17 डिसेंबरला ऍडलेडच्या मैदानात पहिली डे-नाईट टेस्ट खेळवली जाईल. पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परत येईल. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट भारतात परतणार आहे. त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीमध्ये कोणाला संधी मिळणार याबाबत वेगवेगळी मत मांडली जात आहेत. भारताचा माजी ओपनर आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने विराटच्या अनुपस्थितीमध्ये शुभमन गिलला संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. 'शुभमन गिल विराटच्या गैरहजेरीत टेस्टमध्ये पदार्पण करू शकतो. तर केएल राहुल पृथ्वी शॉऐवजी इनिंगची सुरुवात करण्याची शक्यता आहे. जर एखाद्या बॅट्समनने मधल्या फळीत खेळावं असं तुम्हाला वाटत असेल, तर शुभमन गिलला प्राथमिकता मिळाली पाहिजे,' असं आकाश चोप्रा म्हणाला. मधल्या फळीत बॅटिंग करताना शुभमन गिल केएल राहुलपेक्षाही पुढे आहे, अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज पहिली टेस्ट, 17-21 डिसेंबर- ऍडलेड दुसरी टेस्ट, 26-30 डिसेंबर- मेलबर्न तिसरी टेस्ट, 7-11 जानेवारी- सिडनी चौथी टेस्ट, 15-19 जानेवारी- ब्रिस्बेन भारतीय टीम विराट कोहली (कप्तान), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
First published:

पुढील बातम्या