IND vs AUS : चुकीचा कोरोना रिपोर्ट, टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य गायब

IND vs AUS : चुकीचा कोरोना रिपोर्ट, टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य गायब

IND vs AUS टीम इंडियाचा थ्रो डाऊन स्पेशलिस्ट रघू (Throw Down Specailist Raghu) खेळाडूंना नेटमध्ये सराव देतो, पण कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे रघूला सिडनीतल्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

  • Share this:

सिडनी, 26 नोव्हेंबर : टीम इंडिया (Team India) चा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शुक्रवारी सिडनीमध्ये दोन्ही टीम पहिली वनडे मॅच खेळतील, पण या मॅचआधी टीम इंडियाचा सदस्य अजूनही टीममध्ये दाखल झालेला नाही. टीम इंडियाचा थ्रो डाऊन स्पेशलिस्ट रघू (Throw Down Specailist Raghu) खेळाडूंना नेटमध्ये सराव देतो, पण कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे रघूला सिडनीतल्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. आतापर्यंत रघू टीम इंडियामध्ये दाखल व्हायला पाहिजे होता, पण तसं झालेलं नाही.

इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार रघूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, पण नंतर ही टेस्टच चुकीची असल्याचं सांगण्यात आलं, म्हणजेच रघूला कोरोना झाला नव्हता, पण तरीही तो टीम इंडियामध्ये दाखल होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाची वृत्तपत्र द सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि द एज यांनी टीम इंडियाचे मॅनेजर मॉलिन पारीख यांना या मुद्द्यावर मेसेज करून प्रश्न विचारला, पण त्यांनी याबाबतचं उत्तर दिलं नाही. तसंच न्यू साऊथ वेल्सच्या आरोग्य विभागाच्या प्रवक्त्यांनीही रघूबाबत मौन बाळगलं.

थ्रो डाऊन स्पेशलिस्ट असलेला रघू अजूनही पोहोचू शकला नसल्यामुळे टीम इंडियाचं नुकसान झालं आहे. बॅट्समन सराव करत असताना रघू 150 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉलिंग करतो, ज्याचा फायदा खेळाडूंना फास्ट बॉलिंग खेळण्यासाठी होतो. 2013 सालापासून रघू टीम इंडियासोबत आहे. विराट कोहलीनेही त्याच्या यशामागे रघूचं योगदान असल्याचं अनेकवेळा सांगितलं आहे.

Published by: Shreyas
First published: November 26, 2020, 4:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या