मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : टीम इंडियाची जर्सी बदलली, रेट्रो लूकमध्ये मैदानात उतरणार खेळाडू

IND vs AUS : टीम इंडियाची जर्सी बदलली, रेट्रो लूकमध्ये मैदानात उतरणार खेळाडू

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यावर रवाना झाली आहे. या दौऱ्यात भारत वनडे, टी-20 आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या सीरिजसाठी भारतीय टीमची जर्सी बदलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यावर रवाना झाली आहे. या दौऱ्यात भारत वनडे, टी-20 आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या सीरिजसाठी भारतीय टीमची जर्सी बदलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी भारतीय टीम नव्या जर्सीमध्ये मैदानात उतरेल. या जर्सीचे काही फोटो सोशल मीडियावरही शेयर करण्यात आले आहेत.

आऊटलूकमध्ये आलेल्या वृत्तानुसार भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजसाठी नेव्ही ब्ल्यू रंगाच्या जर्सी घालणार आहे. भारतीय टीमने ही जर्सी 80च्या दशकात घातली होती. 1992 सालच्या वर्ल्ड कपमध्येही भारतीय टीमने अशीच जर्सी घातली होती.

टीम इंडियाचा किट स्पॉन्सरही बदलला

काहीच दिवसांपूर्वी टीम इंडियाला नवा किट स्पॉन्सरही मिळाला आहे. टीम इंडियाच्या किटला आता ऑनलाईन गेम कंपनी MPL स्पॉन्सर करणार आहे. याआधी नाईकी टीम इंडियाची स्पॉन्सर होती. नाईकीने बीसीसीआयशी 5 वर्षांचा करार केला होता. आता MPL प्रत्येक मॅचसाठी बीसीसीआयला 65 लाख रुपये देणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सीरिजला सुरुवाात 27 नोव्हेंबरपासून पहिल्या वनडेने सुरुवात होईल. यानंतर दुसरी वनडे 29 नोव्हेंबर आणि तिसरी वनडे 2 डिसेंबरला होईल. 4 डिसेंबरपासून टी-20 सीरिजला सुरुवात होईल. 6 डिसेंबरला दुसरी टी-20 आणि तिसरी टी-20 8 डिसेंबरला होईल. यानंतर 17 डिसेंबरपासून टेस्ट सीरिज सुरू होईल. ऍडलेडमधली ही टेस्ट डे-नाईट असेल. तर दुसरी टेस्ट 26 डिसेंबर, तिसरी टेस्ट 7 जानेवारी आणि चौथी टेस्ट 15 जानेवारीपासून सुरू होईल.

First published: