Home /News /sport /

IND vs AUS : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात बनणार टीम इंडियासाठी नवा सेहवाग!

IND vs AUS : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात बनणार टीम इंडियासाठी नवा सेहवाग!

टीम इंडिया (Team India) चा आक्रमक खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये आहे. आयपीएल (IPL 2020) दरम्यान रोहितच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. रोहित पाच ओव्हर जरी मैदानात टिकला, तर ऑस्ट्रेलियाला त्याला रोखणं कठीण होईल, असं भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई : टीम इंडिया (Team India) चा आक्रमक खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये आहे. आयपीएल (IPL 2020) दरम्यान रोहितच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी रोहित एनसीएमध्ये ट्रेनिंग घेत आहे. दुखापतीमुळे रोहित वनडे आणि टी-20 सीरिज खेळू शकणार नाही, पण तो टेस्ट सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया चार टेस्ट मॅच खेळणार आहे. 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. दुखापत झाली असली तरी रोहित ऑस्ट्रेलियात मोठा स्कोअर करू शकतो. रोहित पाच ओव्हर जरी मैदानात टिकला, तर ऑस्ट्रेलियाला त्याला रोखणं कठीण होईल, असं भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला आहे. रोहित शर्मा बऱ्याच काळापासून टेस्ट टीममधून बाहेर होता, पण केएल राहुलच्याऐवजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी रोहितची टीममध्ये निवड झाली. यानंतर रोहितने ओपनिंगला खेळत लागोपाठ शतक आणि रांचीमध्ये द्विशतक केलं आणि टेस्ट टीममध्ये आपलं स्थान निश्चित केलं. 'रोहित उत्तम खेळाडू आहे, त्याच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. त्याने भारतात जशा रन केल्या, तशाच त्याने ऑस्ट्रेलियातही कराव्यात असं चाहत्यांची आशा आहे. रोहित पाच ओव्हर टिकला, तरी तो धोकादायक ठरेल,' अशी प्रतिक्रिया हरभजनने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना दिली. हरभजन सिंगने रोहितची तुलना सेहवागशीही केली. 'नव्या बॉलचा सामना करणं महत्त्वाचं असेल. जर रोहित चांगला खेळला, तर भारत त्याच्याकडून सेहवागसारख्या रनची अपेक्षा करू शकतो. रोहित टीमसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे, आणि तो वेळेत फिट होईल,' असं वक्तव्य हरभजनने केलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिली टेस्ट संपल्यानंतर भारतात परतणार आहे, त्यामुळे रोहित शर्माचं फिट होणं भारतीय टीमसाठी आणखी महत्त्वाचं होणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात येणार आहे. रोहित शर्मासोबतच इशांत शर्माही ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, असं सांगितलं जात आहे. बुधवारी इशांतने एनसीएमध्ये राहुल द्रविड आणि निवड समिती अध्यक्ष सुनिल जोशी यांच्या देखरेखीखाली बॉलिंगचा सराव केला. रोहित प्रमाणेच इशांतही दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएमध्ये आला आहे. रोहित आणि इशांत टीम इंडियात सामील होण्याआधी ऑस्ट्रेलियात 14 दिवस क्वारंटाईन होतील.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या