IND vs AUS : हा युवा खेळाडू एक्स-फॅक्टर ठरेल, लक्ष्मणचं भाकीत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया (Team India) ची निवड झाली तेव्हा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. या दौऱ्यासाठी (India vs Australia) काही बड्या नावांना संधी देण्यात आली नाही. टी नटराजन (T Natrajan) एक्स-फॅक्टर ठरेल, असं भारताचा माजी क्रिकटपटू व्हीव्हीएस (VVS Laxman) याला वाटत आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया (Team India) ची निवड झाली तेव्हा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. या दौऱ्यासाठी (India vs Australia) काही बड्या नावांना संधी देण्यात आली नाही. टी नटराजन (T Natrajan) एक्स-फॅक्टर ठरेल, असं भारताचा माजी क्रिकटपटू व्हीव्हीएस (VVS Laxman) याला वाटत आहे.

  • Share this:
    मुंबई, 19 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया (Team India) ची निवड झाली तेव्हा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. या दौऱ्यासाठी (India vs Australia) काही बड्या नावांना संधी देण्यात आली नाही, तर आयपीएलमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली. भारताकडून टी-20 क्रिकेट खेळणाऱ्या मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याची टेस्ट टीममध्ये निवड झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची टी-20 टीममध्ये निवड करण्यात आली, पण चक्रवर्तीच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याने या दौऱ्यातून माघार घेतली, त्यामुळे टी नटराजन (T. Natrajan) याला संधी मिळाली. तामीळनाडूचा असलेला 29 वर्षांचा टी नटराजन टीम इंडियासाठी एक्स-फॅक्टर ठरेल, असं भारताचा माजी क्रिकटपटू व्हीव्हीएस (VVS Laxman) याला वाटत आहे. टी नटराजन याची निवड पुढच्या वर्षी होणारा टी-20 वर्ल्ड कप लक्षात घेऊन करण्यात आल्याचंही लक्ष्मण म्हणाला. 'टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी भारतात होणार आहे. भारताला शेवटच्या काही ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करणाऱ्या खेळाडूची गरज आहे. मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांना बॉलिंग करताना बघणं चांगलं वाटतं, पण नटराजन डावखुरा असल्यामुळे त्याला संधी देण्यात आली आहे,' अशी प्रतिक्रिया लक्ष्मण याने दिली. काहीच दिवसांपूर्वी संपलेल्या आयपीएल (IPL 2020) मध्ये नटराजन याने विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सला तीनवेळा विकेट घेतली. चांगले यॉर्कर आणि बाऊन्सर टाकण्यात नटराजन पटाईत आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक यॉर्कर टाकण्याचा रेकॉर्डही नटराजनच्या नावावर राहिला. तामीळनाडू प्रिमियर लीगमध्येही यॉर्कर टाकल्यामुळेच नटराजन नावारुपाला आला. 'नटराजनकडे वैविध्य आहे, ज्याचा वापर त्याने आयपीएलमध्ये केला नाही. नटराजन बाऊन्सर टाकू शकतो, तसंच त्याच्याकडे स्लो बॉल आणि ऑफ कटर टाकण्याचीही क्षमता आहे. तो नव्या बॉलनेही विकेट घेतो, तसंच यॉर्कर टाकण्याचा आत्मविश्वासही त्याच्यामध्ये आहे,' असं वक्तव्य लक्ष्मणने केलं.
    Published by:Shreyas
    First published: