मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : चहल झाला भारताचा सगळ्यात 'यशस्वी' बॉलर, बुमराहच्या विक्रमाशी बरोबरी

IND vs AUS : चहल झाला भारताचा सगळ्यात 'यशस्वी' बॉलर, बुमराहच्या विक्रमाशी बरोबरी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) पहिल्या टी-20 मध्ये तीन विकेट घेणाऱ्या युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला दुसऱ्या मॅचमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही.

  • Published by:  Shreyas
सिडनी, 7 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये तीन विकेट घेणाऱ्या युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला दुसऱ्या मॅचमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समननी चहलचा चांगलाच समाचार घेतला, पण त्याला एक विकेट घेण्यात यश आलं. या विकेटसोबतच चहल बुमराहसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर ठरला. दुसऱ्या टी-20 मध्ये चहलने 4 ओव्हरमध्ये 51 रन देऊन 1 विकेट घेतली. चहलने स्टीव्ह स्मिथला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. स्टीव्ह स्मिथ चहलची 59 वी आंतरराष्ट्रीय टी-20 विकेट होती. चहलने 44 मॅचमध्येच 59 विकेट घेतल्या आहेत, तर बुमराहला एवढ्याच विकेट घेण्यासाठी 50 मॅच लागल्या. भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने 41 विकेट, भुवनेश्वर कुमारने 39 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आहे. मलिंगाने 84 मॅचमध्ये 107 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये चहल टीममध्ये नव्हता, पण जडेजाला दुखापत झाल्यामुळे चहल कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात उतरला. यानंतर त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 25 रन देऊन भारताला जिंकवून दिलं.
First published:

पुढील बातम्या