IND vs AUS : टी-20 सीरिजसाठी धवनसोबत ओपनिंगला कोण? गावसकरांनी सुचवलं हे नाव

IND vs AUS : टी-20 सीरिजसाठी धवनसोबत ओपनिंगला कोण? गावसकरांनी सुचवलं हे नाव

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टी-20 सीरिजसाठी सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी ओपनिंगला शिखर धवन (Shikhar Dhawan) सोबत केएल राहुल (KL Rahul) याचं नाव सुचवलं आहे.

  • Share this:

कॅनबेरा, 3 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली वनडे सीरिज संपल्यानंतर आता टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे. वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळाली नाही. शिखर धवन (Shikhar Dhawan) चांगल्या फॉर्ममध्ये दिसला, पण दुसऱ्या बाजूने कोणीही त्याला साथ दिली नाही. आता टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि कमेंटेटर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी ओपनरसाठी नाव सुचवलं आहे. धवनसोबत केएल राहुल (KL Rahul) याने ओपनिंगला बॅटिंग करावी असं मत गावसकर यांनी मांडलं आहे.

काय म्हणाले गावसकर?

तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाल्यानंतर गावसकर म्हणाले, 'केएल राहुलने शिखर धवनसोबत ओपनिंगला खेळलं पाहिजे. आयपीएलमध्ये सर्वाधिक 670 रन केल्याबद्दल राहुलला ऑरेंज कॅप मिळाली होती. तर धवनने दिल्लीकडून खेळताना 618 रन केले होते. धवनने टी-20 क्रिकेटमध्ये चांगला फॉर्म दाखवला. जर तो 14-15 ओव्हरपर्यंत खेळला, तर चौथ्या क्रमांकावर किंवा पावर प्लेमध्ये दोन विकेट लवकर गेल्या तर श्रेयस अय्यरला बॅटिंगला पाठवलं पाहिजे.'

वनडेमध्ये ओपनर अपयशी

वनडे सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये ओपनिंग करताना मयंक अगरवालने 22 रन केले होते. तर दुसऱ्या वनडेमध्ये त्याला 28 रन करता आल्या. तिसऱ्या वनडेमध्ये मयंकच्याऐवजी शुभमन गिलला संधी देण्यात आली होती, पण गिललाही 33 रनच करता आले. धवनने पहिल्या वनडेमध्ये 74 रनची खेळी केली होती. वनडे सीरिजमध्ये केएल राहुलला पाचव्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली होती, पण तो अपयशी ठरला.

विराट कोणाला संधी देणार?

केएल राहुलने टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून 10 अर्धशतकं केली आहेत, तर धवनलाही तेवढीच अर्धशतकं करता आली आहेत, त्यामुळे विराट कोणाला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारताच्या टी-20 टीममध्ये मयंक अगरवालही आहे. मयंकने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

Published by: Shreyas
First published: December 3, 2020, 5:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या