कॅनबेरा, 3 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजनंतर आता टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे. वनडे सीरिजमध्ये 2-1 ने पराभव झाल्यानंतर आता टी-20 सीरिजमध्ये या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. उद्या म्हणजेच शुक्रवारपासून टी-20 सीरिजला सुरुवात होत आहे. वनडे सीरिजप्रमाणेच ही सीरिज तीन मॅचची असेल. सीरिजची पहिली मॅच 4 डिसेंबर, दुसरी मॅच 6 डिसेंबर आणि तिसरी मॅच 8 डिसेंबरला होईल. पहिली टी-20 मॅच कॅनबेरामध्ये तर उरलेल्या दोन्ही मॅच सिडनीमध्ये होतील.
किती वाजता सुरू होणार मॅच?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिन्ही टी-20 मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी 1.40 वाजता सुरू होणार आहेत.
कुठे बघता येईल मॅच?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मॅचचं प्रसारण, सोनी सिक्स, सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 वर होणार आहे.
लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?
या मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव वर पाहता येणार आहे.
फ्री प्रसारण कसं पाहाल?
भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या मॅचचं फ्री लाईव्ह प्रसारण डीडी स्पोर्ट्स आणि डीडी नॅशनलवर पाहता येईल.
फ्री लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅचचं फ्री लाईव्ह स्ट्रिमिंग एयरटेल पोस्टपेड आणि जियो सबस्क्रायबर एयरटेल स्ट्रीम आणि जियो टीव्हीवर पाहू शकतील.
भारताची टी-20 टीम
शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, दीपक चहर, टी नटराजन, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, मयंक अगरवाल, संजू सॅमसन, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलियाची टी-20 टीम
एरॉन फिंच, मॅथ्यू वेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॉईसेस हेनरिक्स, ऍलेक्स कॅरी, एश्टन एगर, सीन एबॉट, मिचेल स्टार्क, एडम झम्पा, जॉस हेजलवूड, ऍन्ड्रयू टाय, मार्नस लाबुशेन, डीआरसी शॉर्ट, कॅमरून ग्रीन, डॅनियल सॅम्स, मार्कस स्टॉयनिस