सिडनी, 6 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये भारतीय टीम (India vs Australia) सीरिज खिशात टाकण्यासाठी मैदानात उतरेल. याआधी झालेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये भारताचा 11 रनने विजय झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये भारताला पाकिस्तानी टीमचा लागोपाठ 9 टी-20 विजयाचा विक्रमही मोडण्याची संधी आहे. कॅनबेरामध्ये झालेल्या पहिल्या टी-20मध्येच भारताने या विक्रमाची बरोबरी केली होती.
टी-20 क्रिकेटमध्ये भारताने लागोपाठ 9 विजय मिळवले असले, तरी त्यांच्यासाठी एक खेळाडू भलताच लकी ठरत आहे. मनिष पांडे (Manish Pandey) टीममध्ये असताना भारताचा लागोपाठ 20 मॅचमध्ये एकदाही पराभव झाला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये खेळताना मनिष पांडेची कामगिरी निराशाजनक राहिली. 8 बॉलमध्ये 2 रन करून मनिष पांडे माघारी परतला. त्याआधी वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 मध्ये मनिष पांडेने 36 बॉलमध्ये 50 रन केले होते. मार्च 2018 नंतर मनिष पांडे जेव्हा भारतीय टीममध्ये होता, तेव्हा कधीच त्यांचा टी-20मध्ये पराभव झाला नाही.
39 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये भारताकडून खेळताना मनिष पांडेने 44.31 ची सरासरी आणि 126.16 च्या स्ट्राईक रेटने 709 रन केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधला मनिष पांडेचा सर्वाधिक स्कोअर 79 रन आहे.
आयपीएल इतिहासात शतक करणारा मनिष पांडे हा पहिला भारतीय खेळाडू होता. 2009 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलमध्ये बँगलोरकडून खेळताना मनिष पांडेने शतक केलं होतं. आयपीएलच्या 146 मॅचमध्ये 29.71 ची सरासरी आणि 121.67 च्या स्ट्राईक रेटने मनिष पांडेने 3,268 रन केले आहेत. यामध्ये 1 शतक आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये मनिष पांडेचा सर्वाधिक स्कोअर 114 रन आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.