मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : टीम इंडियाने टी-20 सीरिज जिंकली, अनुष्काचा विराटसाठी खास मेसेज!

IND vs AUS : टीम इंडियाने टी-20 सीरिज जिंकली, अनुष्काचा विराटसाठी खास मेसेज!

ऑस्ट्रेलियात टी-20 सीरिज जिंकल्यानंतर (India vs Australia) भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ची पत्नी अनुष्का शर्माने विराट कोहली आणि टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.

  • Published by:  Shreyas
सिडनी, 7 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा 6 विकेटने विजय झाला आहे, याचसोबत भारताने टी-20 सीरिजही जिंकली आहे. पहिल्या टी-20मध्ये भारताचा 11 रनने विजय झाला होता. या सीरिज विजयासोबतच भारताने वनडे सीरिजच्या पराभवाचा बदला घेतला. ऑस्ट्रेलियात टी-20 सीरिज जिंकल्यानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ची पत्नी अनुष्का शर्माने विराट कोहली आणि टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. 'सीरिज जिंकली. टीमची जबरदस्त कामगिरी,' अशी इन्स्टा स्टोरी अनुष्काने पोस्ट केली. सोबतच तिने विराटसाठी My Love असं म्हणत हृदयाचा इमोजीही पोस्ट केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली शेवटची टी-20 मॅच मंगळवार 8 डिसेंबरला खेळवली जाणार आहे. यानंतर दोन्ही टीममध्ये चार टेस्ट मॅचची सीरिज सुरू होईल. ऍडलेडच्या मैदानात 17 डिसेंबरपासून पहिली टेस्ट मॅच खेळवली जाईल. ही टेस्ट मॅच डे-नाईट असेल. पहिली टेस्ट मॅच संपल्यावर विराट कोहली भारतात परतणार आहे. अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट दौरा अर्धवट सोडणार आहे. जानेवारी 2021 मध्ये अनुष्का शर्माची प्रसुती होणार आहे. अनुष्काच्या प्रसुतीवेळी तिच्यासोबत राहण्यासाठी विराटने पितृत्वाची रजा मागितली होती. बीसीसीआयने ही रजा मंजूर केली. ऑस्ट्रेलियासोबत दुसऱ्या टी-20 मध्ये विजय मिळवत भारताने नवा रेकॉर्ड केला. लागोपाठ 10 टी-20 मॅचमध्ये विजय मिळवण्याचा विक्रम भारतीय टीमने केला. पाकिस्तानच्या लागोपाठ 9 विजयांचा रेकॉर्ड भारताने मोडून काढला. टी-20 मॅचमध्ये लागोपाठ विजय 12 अफगानिस्तान (2018-19) 11 अफगानिस्तान (2016-17) 10 भारत (2020) * 09 पाकिस्तान (2018) याआधी भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 3 मॅच, न्यूझीलंडविरुद्ध 5 मॅच आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन मॅच जिंकल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध यशस्वी पाठलाग 198 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2016 195 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2020 174 श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गिलॉन्ग, 2017 169 श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, 2017
First published:

पुढील बातम्या