Home /News /sport /

सूर्यकुमार यादवने आता टीम इंडियाच्या या क्रिकेटपटूला केलं ट्रोल

सूर्यकुमार यादवने आता टीम इंडियाच्या या क्रिकेटपटूला केलं ट्रोल

आयपीएल (IPL) मध्ये मुंबई (Mumbai Indians) कडून खेळणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या सोशल मीडियामुळे चर्चेत आला आहे. काहीच दिवसांपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ला ट्रोल करणारी पोस्ट सूर्यकुमार यादवने लाईक केलं होतं.

पुढे वाचा ...
    मुंबई : आयपीएल (IPL) मध्ये मुंबई (Mumbai Indians) कडून खेळणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या सोशल मीडियामुळे चर्चेत आला आहे. काहीच दिवसांपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ला ट्रोल करणारी पोस्ट सूर्यकुमार यादवने लाईक केलं होतं. यानंतर आता सूर्यकुमार यादवने टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यालाही ट्रोल केलं आहे. चहल आयपीएलमध्ये विराटच्याच बँगलोर (RCB) टीममध्ये होता. आयपीएल संपल्यानंतर तो टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 27 नोव्हेंबरला वनडे सीरिजपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटसाठीचे खेळाडू ऑस्ट्रेलियात बायो बबलमध्ये सराव करत आहेत. सरावादरम्यान युझवेंद्र चहल यानेही बॅटिंग केली. चहलने त्याच्या या बॅटिंगचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेयर केला. या व्हिडिओवर सूर्यकुमार यादव, डेल स्टेन आणि अन्य क्रिकेटपटूंनी कमेंट करत चहलला ट्रोल केलं.
    तुझ्याकडून बॅट घ्यावी लागणार असं दिसतंय, अशी कमेंट सूर्यकुमार यादवने केली. चहलने सूर्याच्या या कमेंटला रिप्लाय दिला. हा बॅट घे, 10 हजार रन बाकी आहेत, असं चहल म्हणाला. तर फास्ट ऑफ स्पिनरसमोर बॅटिंग करत आहेस का? असा प्रश्न डेल स्टेनने विचारला. आपण दोघं बॉलर म्हणूनच चांगले आहोत, अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान याने दिली. टी-20 टीम विराट कोहली, शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन वनडे टीम विराट कोहली, शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, संजू सॅमसन टेस्ट टीम विराट कोहली, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान सहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव,रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या