Home /News /sport /

IND vs AUS : विराटला शुभेच्छा देऊन ट्रोल झाला सूर्यकुमार यादव

IND vs AUS : विराटला शुभेच्छा देऊन ट्रोल झाला सूर्यकुमार यादव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ने विक्रम केल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने त्याचं अभिनंदन केलं, पण यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं.

    कॅनबेरा, 2 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडिया (India vs Australia) चा विजय झाला, तरी भारताने ही सीरिज 2-1 ने गमावली. कॅनबेरामध्ये झालेल्या या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 12 हजार रन पूर्ण करण्याचा विक्रम केला. या मॅचआधी विराटला 12 हजार रन पूर्ण करण्यासाठी 23 रनची गरज होती. विराटने 242 इनिंगमध्ये हा टप्पा गाठला, तर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ला हेच रेकॉर्ड करण्यासाठी 300 इनिंग लागल्या. हा विक्रम केल्यानंतर मुंबई इंडियन्सचा बॅट्समन सूर्यकुमार यादव याने विराट कोहलीला शुभेच्छा देणारं ट्विट केलं, पण या ट्विटमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीची सरासरी 60 च्या आसपास आहे, तसंच त्याने वनडेमध्ये 43 शतकं आणि 59 अर्धशतकं केली आहे. 2008 साली विराटने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या मॅचमध्ये 78 बॉलमध्ये 63 रन करून तो आऊट झाला. तेंडुलकरने 1989 ते 2012 या कालावधीमध्ये 463 वनडेमध्ये 44.83 च्या सरासरीने 18,426 रन केले, यामध्ये 49 शतकं आणि 96 अर्धशतकांचा समावेश होता. विराट कोहलीच्या या विक्रमावर ट्विट करताना सूर्यकुमार यादव म्हणाला, सगळ्यात जलद आणि आणखी एका विक्रम, विराटच्या वनडे क्रिकेटमध्ये 12 हजार रन पूर्ण, काय खेळाडू आहे, द ब्रॅण्ड असं ट्विट सूर्यकुमारने केलं. यानंतर सूर्यकुमार यादव ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. सूर्यकुमार यादवने विराटबाबतच्या एका वादग्रस्त ट्विटला लाईक केलं होतं. यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावरच टीका करण्यात आली होती. यानंतर सूर्यकुमारने ते ट्विट अनलाईक केलं, तरीही त्याच्यावर टीका करण्यात आली. यानंतर सूर्यकुमार यादवने विराटचं कौतूक करणारी बरीच ट्विट केली, तरीही त्याच्यावरची टीका कमी झाली नाही. मागच्या तीन आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादवने चमकदार कामगिरी केली आहे. 2018 साली त्याने 14 मॅचमध्ये 512 रन केले, यानंतर मागच्या आयपीएलमध्ये 16 मॅचमध्ये 424 तर या मोसमात त्याने 480 रन केले. लागोपाठ तीन मोसमात 400 रन करणारा सूर्यकुमार यादव पहिला अनकॅप (टीम इंडियाकडून न खेळलेला) खेळाडू ठरला. तरीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची निवड झाली नाही, त्यामुळे अनेक दिग्गजांनी आणि क्रिकेट चाहत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या