IND vs AUS : पहिल्या टेस्टमध्ये या खेळाडूंना संधी दे, गावसकरांचा विराटला सल्ला

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरूवात होणार आहे. या मॅचआधी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli याला याबाबत सल्ला दिला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरूवात होणार आहे. या मॅचआधी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli याला याबाबत सल्ला दिला आहे.

  • Share this:
    सिडनी, 15 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरूवात होणार आहे. डे-नाईट टेस्ट असल्यामुळे ही मॅच गुलाबी बॉलने खेळवली जाईल. मॅचला आता अवघे काही तास शिल्लक असतानाही कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुढे ओपनर आणि विकेट कीपर म्हणून कोणाला खेळवायचं याबाबत प्रश्न आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराटला याबाबत सल्ला दिला आहे. टेस्टसाठी विराटकडे ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि ऋद्धीमान साहा (Wridhiman Saha) हे दोन पर्याय आहेत. पण विराटने ऋषभ पंत याला संधी दिली पाहिजे, कारण त्यामुळे बॅटिंगमध्ये जास्त लवचिकता येते, असं गावसकर म्हणाले आहेत. संपूर्ण आयपीएलमध्ये ऋषभ पंत फॉर्ममध्ये नसला, तरी सराव सामन्यात त्याने 73 बॉलमध्ये 103 रन केले. 'निवड समितीसाठी या गोष्टी खूप कठीण असतील. चार वर्षांपूर्वी ऋषभ पंत चारही टेस्ट खेळला होता. त्यावेळी त्याने एक शतकही केलं होतं आणि विकेटमागेही चांगली कामगिरी केली होती. काहीच दिवसांपूर्वी सराव सामन्यात त्याने शतक केलं होतं, त्यामुळे टीमची तो पहिली पसंती असला पाहिजे,' असं गावसकर म्हणाले. 'ऋषभ पंतपेक्षा साहाची विकेट कीपिंग चांगली असली, तरी ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या आव्हानात्मक नाहीत. ज्या खेळपट्टीवर बॉल वळतो, तिकडे तुम्हाला सर्वोत्तम विकेट कीपर लागतो. ऑस्ट्रेलियात विकेट कीपर थोडा मागे उभा राहू शकतो, त्याच्याकडे जास्त वेळ असतो, मग ऋषभ पंतला संधी मिळण्यात काहीच हरकत नाही,' अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. बॅटिंगमध्ये मयंक अगरवाल (Mayank Agarwal) ओपनिंगला खेळेल, पण त्याच्याबरोबर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) शुभमन गिल (Shubhaman Gill) याला संधी मिळावी, असं गावसकर म्हणाले आहेत. भारताची बॅटिंग अजून अस्थिर आहे. मयंक ओपनर आहे, पण त्याच्यासोबत कोण बॅटिंग करेल. शुभमन गिलने दोन सराव सामन्यात 0, 29, 43 आणि 65 रन केले, तर पृथ्वी शॉने 0, 19, 40 आणि 3 रनची खेळी केली. 'पृथ्वी शॉला त्याच्या बॅटिंगवर अजून काम करावं लागणार आहे. ओपनिंग बॅट्समनला वेळेची गरज असते, ज्यामुळे तो नवीन बॉल खेळू शकेल. त्याला स्वत:चा डिफेन्स मजबूत करावा लागेल. मयंक अगरवालकडूनही मी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहे,' असं गावसकर म्हणाले.
    Published by:Shreyas
    First published: