Home /News /sport /

IND vs AUS : ...तर तुम्ही सबस्टिट्युट घ्यायच्या लायक नाही, गावसकरांनी जडेजाला खडसावलं

IND vs AUS : ...तर तुम्ही सबस्टिट्युट घ्यायच्या लायक नाही, गावसकरांनी जडेजाला खडसावलं

भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला खडसावलं आहे.

    सिडनी, 6 डिसेंबर : भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला खडसावलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचवेळी रविंद्र जडेजाला दुखापत झाल्यानंतर त्याच्याऐवजी युझवेंद्र चहल कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात आला, पण ऑस्ट्रेलियाने याला आक्षेप घेतला होता. या वादावर आता सुनिल गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कनकशन सबस्टिट्युट म्हणून जडेजाऐवजी चहल मैदानात येण्यामागे काहीही गैर नाही, पण जर तुम्हाला बाऊन्सर खेळता येत नसेल, तर त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला मैदानात उतरण्याची संधी दिली जाऊ नये, असं गावसकर म्हणाले आहेत. तुम्हाला बाऊन्सर खेळता येत नसेल, तर तुम्ही कनकशन सबस्टिट्युट घ्यायचा लायक नाही, असं परखड मत गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. पहिल्या टी-20 मॅचवेळी शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजाच्या हेल्मेटला बॉल लागला. यानंतर जडेजाचा कनकशन सबस्टिट्युट म्हणून चहल मैदानात आला. चहलने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 3 विकेट घेत, भारताला विजय मिळवून दिला. एवढच नाही तर चहल हा पहिला कनकशन मॅन ऑफ द मॅचही ठरला. 'जडेजाच्याऐवजी चहल मैदानात येण्यात काहीही अडचण नाही. नियमानुसार ज्या प्रकारचा खेळाडू दुखापतग्रस्त होतो, तोच खेळाडू कनकशन म्हणून मैदानात आला पाहिजे, पण चहल ऑलराऊंडर नाही. पण मॅच रेफरी डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन आहेत, त्यांना जर याबाबत आक्षेप नसेल, तर त्यावर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही,' असं गावसकर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले. 'मी कनकशन सबस्टिट्युटच्या नियमाशी सहमत नाही. मी तुम्हाला जुन्या विचारांचा वाटेन पण, जर तुम्हाला बाऊन्सर खेळता येत नसेल आणि तुमच्या डोक्याला बॉल लागत असेल, तर तुम्ही पर्यायी खेळाडू घेण्याच्या लायक नाही. सध्या नियमांमुळे बदली खेळाडू घ्यायचा पर्याय उपलब्ध आहे, त्यामुळे जडेजाऐवजी चहलच्या खेळण्याबाबत काहीही अडचण नसावी,' असं वक्तव्य गावसकर यांनी केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या