मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : विराटची 'एबी'स्टाईल बॅटिंग, शॉट पाहून डिव्हिलियर्सही फिदा!

IND vs AUS : विराटची 'एबी'स्टाईल बॅटिंग, शॉट पाहून डिव्हिलियर्सही फिदा!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs Australia) 6 विकेटने विजय झाला. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने मारलेला एक शॉट बघून चाहत्यांना एबी डिव्हिलियर्स (AB Devilliers) याची आठवण आली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
सिडनी, 7 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs Australia) 6 विकेटने विजय झाला. याचसोबत भारताने ही टी-20 सीरिजही जिंकली. याआधी पहिल्या टी-20मध्ये भारताचा 11 रनने विजय झाला होता. या दोन्ही टीममध्ये झालेली दुसरी मॅच रोमांचक झाली. भारताने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने अर्धशतकीय खेळी केली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 194 रन करता आले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 195 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 19.4 ओव्हरमध्येच केला. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने मारलेला एक शॉट बघून चाहत्यांना एबी डिव्हिलियर्स (AB Devilliers) याची आठवण आली. विराट कोहलीने स्टम्पच्या बाहेर जाऊन एक गुडघा जमिनीवर टेकवून बॉल लेग साईड बाऊंड्रीच्या बाहेर पाठवला. विराटचा हा शॉट बघून चाहत्यांनी त्याची तुलना एबी डिव्हिलियर्सशी केली. या शॉटबाबत एबी डिव्हिलियर्सला मेसेज करीन आणि त्याला काय वाटतं हे विचारीन, असं विराट कोहली म्हणाला. विराटच्या या वक्तव्यावर एबी डिव्हिलियर्सनेही प्रतिक्रिया दिली. विराटने मारलेला हा शॉट डिव्हिलियर्सलाही आवडला, त्याने हा शॉट सुरेख असल्याचं सांगणारी स्माईली टाकली. विराट कोहलीने या मॅचमध्ये 24 बॉल खेळून 40 रन केले. भारताने 18 व्या ओव्हरमध्ये 12 रन केले. यानंतर विजयासाठी शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 25 रनची गरज होती. तेव्हा हार्दिकने दोन फोर मारल्या, यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 14 रन हव्या होत्या. पांड्याने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन रन काढल्यानंतर दोन सिक्स मारत भारताला जिंकवून दिलं. 22 बॉलमध्ये 42 रन करणाऱ्या पांड्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
First published:

पुढील बातम्या