IND vs AUS : पाकिस्तानचा सगळ्यात मोठा विक्रम मोडण्याची टीम इंडियाला संधी

IND vs AUS : पाकिस्तानचा सगळ्यात मोठा विक्रम मोडण्याची टीम इंडियाला संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय टीम (India vs Australia) नवा विक्रम करण्यासाठी मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली टी-20 जिंकल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli)च्या टीमची नजर फक्त सीरिज जिंकण्यावरच नाही, तर पाकिस्तानचं मोठं रेकॉर्ड तोडण्यावरही आहे.

  • Share this:

सिडनी, 6 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय टीम (India vs Australia) नवा विक्रम करण्यासाठी मैदानात उतरेल. याआधीच्या लागोपाठ 9 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. या 9 मॅचपैकी 2 मॅच भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली टी-20 जिंकल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli)च्या टीमची नजर फक्त सीरिज जिंकण्यावरच नाही, तर पाकिस्तानचं मोठं रेकॉर्ड तोडण्यावरही आहे.

रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर लागोपाठ 10 आंतरराष्ट्रीय टी-20 जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर होईल. याआधी पाकिस्तानने 2018 साली लागोपाठ 9 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅच जिंकल्या होत्या.

जुलै 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये पाकिस्तानने ट्राय सीरिजमध्ये झिम्बाब्वेला आणि मग ऑस्ट्रेलियाला दोनदा पराभूत केलं होतं. यानंतर युएईमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला तीन-तीन वेळा हरवलं. भारताने शुक्रवारी कॅनबेरामध्ये झालेल्या पहिल्या टी-20 मध्येच पाकिस्तानच्या या विक्रमाशी बरोबरी केली.

2019 साली वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला मुंबईमध्ये विजय मिळवला होता. यानंतर 2020 साली भारताने श्रीलंकेविरुद्ध टी-20 सीरिज खेळली होती. यातली गुवाहाटीची पहिली मॅच पावसाने रद्द झाली. तर इंदूर आणि पुण्यात झालेल्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा विजय झाला. तर न्यूझीलंडमध्ये भारताने टी-20 सीरिज 5-0 ने जिंकली. यातल्या दोन मॅचमध्ये भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.

लागोपाठ सगळ्यात जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. 2018 पासून 2019 पर्यंत अफगाणिस्तानने लागोपाठ 12 मॅच जिंकल्या होत्या. 2016 ते 2017 यावर्षात लागोपाठ 11 मॅच जिंकण्याचा विक्रमही अफगाणिस्तानच्या नावावर आहे. जर भारताचा ऑस्ट्रेलियामध्ये 3-0 ने विजय झाला, तर अफगाणिस्तानच्या लागोपाठ 11 विजयाच्या रेकॉर्डशी बरोबरी होईल. तसंच भारत टी-20 क्रमवारीतही दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

Published by: Shreyas
First published: December 6, 2020, 12:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या