मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : पांड्याची बॅटिंग बघून घाबरली ऑस्ट्रेलिया, आठवला हा भारतीय खेळाडू

IND vs AUS : पांड्याची बॅटिंग बघून घाबरली ऑस्ट्रेलिया, आठवला हा भारतीय खेळाडू

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर (Justin Langer) यांनी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने दुसऱ्या टी-20 मध्ये केलेली बॅटिंग अविश्वसनीय होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

    सिडनी, 7 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर (Justin Langer) यांनी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने दुसऱ्या टी-20 मध्ये केलेली बॅटिंग अविश्वसनीय होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एवढच नाही तर लॅन्गर यांनी पांड्याची तुलना धोनीशी केली आहे. पांड्याने 22 बॉलमध्ये 42 रनची पार्टनरशीप करत भारताला विजय मिळवून दिला. त्याआधी शिखर धवनने 36 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली होती. मॅच संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना लॅन्गर म्हणाला, 'पांड्याच्या खेळीवर अजून विश्वास बसत नाही. पांड्या किती धोकादायक आहे, हे आम्हाला माहिती आहे. याआधी आम्ही धोनीला बघितलं आहे, पांड्याने आज धोनीसारखीच बॅटिंग केली. या मोसमात पांड्याने उत्कृष्ट बॅटिंग केली आहे. भारताला टी-20 क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू असल्याचा फायदा झाला आहे,' असं वक्तव्य लॅन्गर यांनी केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 14 रनची गरज होती, तेव्हा पांड्याने दोन रन आणि दोन सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. पांड्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताकडून सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. वनडे सीरिजमध्ये त्याने 90, 28 आणि नाबाद 92 रनची खेळी केली होती. तर टी-20 मध्ये त्याने 16 आणि 42 रन केले. वनडे सीरिजमध्ये भारताचा 2-0ने पराभव झाल्यानंतर भारताने जोरदार पुनरागमन केलं आणि टी-20 सीरिज जिंकली. पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा 11 रनने तर दुसऱ्या टी-20मध्ये 6 विकेटने विजय झाला. आता तिसरी टी-20 मॅच मंगळवार 8 डिसेंबरला होणार आहे. या मॅचमध्येही ऑस्ट्रेलियाला हरवून सीरिज व्हाईट वॉश जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या